Saturday, October 10, 2026

मुनगंटीवार म्हणाले,चंद्रपुरातील लोक “शिकलेली”,ते जात बघणार नाहीत ….. !

चंद्रपूर:-
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक दिवसोंदिवस अटीतटीची होत आहे.भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात मागील निवडणुकीत राज्यातून एकमेव विजयी झालेल्या बाळू धानोरकर यांच्या पत्नी काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात हि लक्षवेधी लढत होत आहे.चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा कुणबीबहूल आहे.याच भरवश्यावर बाळू धानोरकरांनी मागील निवडणुकीत बाजी मारली होती.आत्ताही तीच परिस्थीती दिसताहे.यामुळे “जात फॅक्टर” रोकण्यासाठी मुनगंटीवार जिवाचे रान करताहेत.गेल्या अनेक दिवसांपासून याचीच “रि” ओढणा-या सुधीर मुनगंटीवार यांनी आज चंद्रपूर मतदारसंघातील लोक शिकलेली आहेत.ते कदापी जात बघणार नाही अस विधान केलय.राजुरा येथे मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी यांची जाहीर सभा झाली.यावेळी ते बोलत होते.
गेल्या तीस वर्षापासून आपण विधानसभा मतदारसंघाच प्रतिनीधीत्व केल आहे.पण आपण कधीच जातीला थारा दिला नाही.आपला अजेंडा हा विकासच राहिला आहे.गेल्या तीस वर्षात आपण चंद्रपूरचा चेहरामोहरा बदलला.आता चंद्रपूरला देशातील सर्वात उत्कृष्ठ मतदारसंघ बनविण्याचा आपला मानस आहे.आपल्याकडे जो कुणी आला त्याला आपण मदतीचा हात दिला आहे.तो कोणत्या जातीचा आहे,पातीचा आहे.हे आपण कधीच बघितल नाही.आता चंद्रपूरात जे जातीच राजकारण सुंरू आहे.ते चिंतनीय आहे.तर तुम्ही एखादया जातीला घेउन चालत असाल तर मग तेली,माळी,एससी,एसटी,शिंपी,सोनार,कल्लार,व इतर जातींनी काय कराव.आपण विकासाची पंचसुत्री निर्माण केली आहे.तिथे जात नसेल,व्यक्ती असेल,माणुसकी असेल असेही मुनगंटीवार म्हणाले यावेळी नितीन गडकरी यांनी आपल्या मार्गदर्शनातून सुधीर मुनगंटीवार यांना प्रचंड बहूमताने निवडून देण्याचे आवाहन केले.मुनगंटीवार हे कर्तुत्ववान व्यक्तीमत्व आहे.त्यांचे विकासाचे “व्हिजन:” हे जबरदस्त आहे.चंद्रपूरात त्यांनी केलेली काम हिच त्यांची पावती आहे.असेही गडकरी म्हणाले.राजुरा विधानसभा मतदारसंघातील भाजप नेत्यांसह अनेक कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.

 

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!