चंद्रपूर:-
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये कमालीच व्दंद पेटल होत.प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर झाली.यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे धानोरकरांना साथ देणार नाही असे बोलल्या जात होते.आज मात्र वडेट्टीवारांनी चंद्रपुरात येत या चर्चांना पुर्णविराम दिलय.विजय वडेट्टीवार जिथे जातो तिथे विजय होतेच.मी आता आलो आहे.येत्या 9 तारखेपासून प्रचार करू.आणी प्रतिभा धानोरकरांना खासदार बनवूनच दम घेउ असा विश्वास त्यांनी दिला.उमेदवारी वरून निर्माण झालेल्या दावेदारीनाटयानंतर पहिल्यांदाच आज विजय वडेट्टीवार,प्रतिभा धानोरकर एकत्र आले.यावेळी उपस्थित कार्यकर्त्यात कमालीचा उत्साह बघायला मिळाला.
चंद्रपूर येथील इम्पेरियल पॅलेस येथे आज काॅग्रेस कार्यकर्त्याच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.दोन दिवसांपुर्वीच प्रतिभा धानोरकर,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी गडचिरोलीत विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली,चर्चाही केली.वडेट्टीवार आमचे जेष्ठ नेते आहेत.त्यांचे आशिर्वाद घेणे आमचे कर्तव्य आहे.त्यांना बैठकीचे निमंत्रण दयायला आम्ही गेलो होतो.अशी प्रतिक्रीया धानोरकरांनी दिली होती.प्रतिभा धानोरकर यांच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करतांना वडेट्टीवार आले नव्हते.यामुळे आज ते चंद्रपुरात येतील का याबाबत काॅग्रेसच्या वर्तुळात उत्साह तेवढाच संभ्रम होता.अखेर आजच्या बैठकीत विजय वडेट्टीवार दाखल झालेच.त्यांच्या उपस्थितीने काॅग्रेस कार्यकर्त्यात नवी उमेद निर्माण झाली.कार्यकर्त्याचा जोश बघून वडेट्टीवारांनी आपल्या भाषणातून मी आता मैदानात उतरलो आहे.विजय आमचाच होणार आहे.प्रतिभा धानोरकर या खासदार होतीलच असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.मी जिथे जातो तिथे विजय होतोच,येत्या 9 तारखेपासून आपण स्वत प्रचाराच्या कार्याला सुरवात करू असे सांगताच सभागृहात टाळयांचा कळकळाट झाला.चंद्रपुरात उमेदवारीला घेत निर्माण झालेल्या संघर्षानंतर पहिल्यांदाच,धानोरकर एकत्र आल्याने कार्यकर्त्यात कमालीचा जोश बघायला मिळाला.यावेळी प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून विविध मुदयांवर भाष्य केल.मी लढणारी आहे.जिथे लाथ मारीन तिथून पाणी काढण्याची ताकद ठेवते असे त्या म्हणाल्या.कार्यकर्ता बैठतील काँग्रेसचे अनेक जेष्ठ नेते उपस्थित होते



