Sunday, June 28, 2026
spot_img

गडचिरोलीच्या कामगिरीचे दिल्लीत कौतूक

गडचिरोली:-
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात यावेळी भाजपप्रणीत महायुतीला मोठया पराभवाला सामोरे जावे लागले.तर मागील निवडणुकीत केवळ 1 जागा जिंकणा-या काॅग्रेसला जनतेनी मोठा कौल दिला.राज्यात काॅग्रेसचे 13 खासदार निवडून आले.राज्यात सर्वात मोठा पक्ष काॅग्रेसच ठरला आहे.काॅग्रेसच्या या यशात अखेरच्या टोकावरील गडचिरोली जिल्हयाचे मोठे योगदान राहिले.गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रात काॅग्रेेसच्या डाॅ.नामदेव किरसान यांनी मोठा विजय मिळविला.तस पाहिलं तर खऱ्या अर्थाने राज्याचे उपमुख्यमंत्री,गडचिरोलीचे पालकमंत्री,तथा भाजपचे राज्यातील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनांच त्यांनी मात दिली आहे.गडचिरोलीत भाजपचे उमेदवार अशोक नेते यांच्या विजयाकरिता फडणवीसांनी फिल्डींग लावली होती.पण त्यात त्यांना मोठे अपयश आले.आज काॅग्रेसचे गडचिरोलीतील खासदार डाॅ.नामदेव किरसान यांनी दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांनी भेट घेतली.यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेटटीवार,काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांची उपस्थिती होती.

गडचिरोली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत.काॅग्रेसच्या डाॅ.नामदेव किरसान यांनी तब्बल 6 लाख 17 हजार 792 मते घेतली.भाजपच्या अशोक नेते यांना 4 लाख 76 हजार 96 मते मिळाली.किरसान यांनी नेतेंचा तब्बल 1 लाख 41 हजार 696 मतांनी पराभव केला.सोबतच नेतेच्या हॅट्रीकचे स्वप्न पुरते भंगविले.नामदेव किसरान हे गेल्या पंधरा वर्षापासून गडचिरोली काॅग्रेसचे सक्रियपणे काम करीत आहेत.मागील दोन निवडणुकीत त्यांनी पक्षाकडे लोकसभेची उमेदवारी मागितली होती.पण त्यांच्या पदरी निराशाच आली.अशास्थितीत त्यांनी ना पक्ष सोडला.ना पक्षाचे काम थांबविले.गेल्या अनेक वर्षापासून किरसान सातत्याने गडचिरोलीच्या गावागावात,दुर्गम भागात जाऊन आपले काम प्रामाणीकपणे पार पाडीत होते.दोनदा लोकसभेच्या उमेदवारीला हुलकावणी मिळाली.त्यांच्या जागी नामदेव उसंेडी यांना पक्षाने पसंती दिली.उसेंडी दोन्हीदा पराभूत झाले.अशावेळी किरसान यांची एकनिष्ठता,त्यांची काम करण्याची पध्दत,सामान्यात मिसळण्याची भूमीका नेत्यांनाही प्रभावीत करून गेली.राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेटटीवार यांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली.अनं त्यांच्या हातात हात दिला.मग काय किरसान यांना काॅग्रेसची तिकीट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.यानंतर नामदेव उसेंडी,डाॅ.कोडवते दाम्पत्य भाजपत गेले.अगदी निवडणुकीच्या काळात हा काॅग्रेसला मोठा धक्का होता.पण डाॅ.नामदेव किरसान,काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केलेली प्रचंड मेहनत कामात आली.राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेटटीवार हे किरसान यांच्यासाठी गडचिरोलीत ठाण मांडून बसले होते.गडचिरोलीत भाजपाविरोधात असलेला सामान्य जनतेतील रोष,भूमीअधिग्रहणाच्या मुदयावरून शेतक-यांचा संताप,रोजगाराचा प्रश्न हे मुददे चांगलेच गाजले.
गडचिरोलीत काँग्रेसचा झालेला विजय हा अतिशय महत्वाचा मानला जात आहे.दरम्यान आज नवनिर्वाचीत खासदार डाॅ.नामदेव किरसान यांनी काॅग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांची भेट घेतली.यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेटटीवार,काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांची उपस्थिती होती.यावेळी पक्षाच्या वतीने गडचिरोलीत मिळविलेल्या या विजयाबाबत कौतूक करण्यात आले.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!