पेपरफुटीमुळे देशभरातील युवा चिंताग्रस्त आहे.त्यांचे उज्वल भविष्य धोक्यात आले आहे.तरूणाई रस्त्यावर आहे.सारीकडे संतापच संताप आहे.मणीपूर वर्षभरापासून जळत होता.पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर काही बोलायला तयार नाहीत.योगा करण्यासाठी वेळ काढणा-या मोदींना हे ज्वलंत तितकेच महत्वाचे प्रश्न गंभीर का वाटत नाही.असा सवाल आता देशभरातून विचारला जात आहे.
अठराव्या लोकसभा निवडणुकीत देशाने संमिश्र कौल दिला. ‘‘चारशे पार’’ चा नारा भाजपच्या चांगलाच अंगलट आला.संविधानाला धोका,पेपरलीक,बेरोजगारी,महागाई हे सारे मुददे विरोधकांनी पोटतिडकीने मांडलेत.अनं यामुळेच भाजपला या निवडणुकीत स्पष्ट बहूमत मिळू शकले नाही.आता हे सरकार कुबडयावर चालले आहे.सरकार केव्हा कोसळेल हे सांगता येत नाही.पण यांचा अंहभाव मात्र कायम आहे.‘‘सबका साथ सबका विकास’’ असा नारा मागील निवडणुकीत मोदींनी दिला.देशाने त्यांना बहूमताने कौल दिला.विशेष म्हणजे देशातील युवा मतदारांनी मोदीवर विश्वास टाकला.पण वेळोवेळी या सरकारने तरूणाईचा अपेक्षाभंगच केला.वर्षाला दोन करोड तरूणांना रोजगार देण्याचे मोदींचे आश्वासन असे होते कि पुछो मत.दोन करोड रोजगार तर मिळाले नाही.उलट हजारो तरूण बेरोजगार झाले.आता तर हे सरकार तरूणाईचा अंत पहात आहे असेच वाटते.
देशात पेपरलीक चा मुददा ऐरणीवर आला आहे.लाखो तरूणांचे उज्वल भविष्य धोक्यात आहे.विद्यार्थी चिंतातूर आहे.पालकांत संतापाची लाट आहे.युवा रस्त्यावर उतरला आहे.मणीपूर वर्षभरापासून पेटत आहे.आरएसएस ने या मुददयावर सत्ताधा-याचे अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कान टोचले.पण त्याचाही फारसा परिणाम दिसून आला नाही.सबका साथ,सबका विश्वास असा नारा देणारे मोदी मणीपूर,पेपरलीक या अतिशय गंभीर विषयांवर भाष्य का करीत नाही..गेल्या दशकभरापासून सत्ताधीश पंतप्रधानांनी अजून एकही पत्रकारपरिषद घेतली नाही.आता पार पडलेल्या निवडणुकीत मात्र त्यांनी अनेक माध्यमसमुहांना मुलाखत दिली.आधीच नोक-यांचा अभाव,अशात पेपरफुटीच्या मोठया प्रमाणावर होत असलेल्या घटना तरूणांचे मनोबल खचविणा-या ठरल्या आहेत.देशविदेशातील विविध मुदयावर भाष्य करणारे,निवडणूक प्रचारात अतिशय लहानलहान मुददयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या अतिशय महत्वाच्या प्रश्नावर का बोलत नाही.



