Sunday, June 28, 2026
spot_img

मुख्यमंत्र्यांना पत्र… मुनगंटीवार म्हणाले,त्यांना तातडीने हवा मदतीचा हात….!

 

चंद्रपूर

विजय झाला तर माजायचे नाही. अनं पराभव झाला तर लाजायचे नाही असे राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार वारंवार सांगतात.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा मोठा पराभव झाला. पण त्यांनी हार न मानता आपल्या विकासकामांचा सपाटा सुरूच ठेवला आहे.चंद्रपूर जिह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील निराधारांना एप्रिल महिन्यापासून अनुदान मिळाले नाही.यामुळं हजारो निराधारांना मोठया संकटाचा सामना करावा लागत होता.ही बाब लक्षात येताच मुनगंटीवार यांनी अनुदानाच्या पूर्ततेची कार्यवाही व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीले.लवकरात लवकर त्यांना निधी वितरित करण्याची मागणी केली.यामुळं हा निधी आता लवकर उपलब्ध होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

निधीवाढीतही योगदान….!

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सुरवातीला लाभार्थ्यांना 600 रुपयाचे अनुदान मिळत होते.निराधारांना मिळणारे हे अनुदान अतिशय कमी असून त्यात वाढ करण्याची मागणीसाठी त्यांनी विधानसभेत आवाज उठवीला होता. दरम्यान राज्याचे अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांनी निराधारांचे अनुदान 600 रुपयावरून 1200 रुपये केले.त्यांच्याच पाठपुराव्यामुळे यात पुन्हा 300 रुपयांची भर पडली.आता निराधारांना प्रती महिना 1500 रुपये अनुदान देण्यात येते.

विकासावरच भर….

लोकसभा निवडणूक लढविण्याची सुधीर मुनगंटीवार यांची इच्छा नव्हती. पण पक्षआदेशाने त्यांचा नाइलाज झाला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार यांचा संपूर्ण एजेंडा विकासाचा होता. जातीय समीकरण विरुद्ध विकास अशी याठिकाणी लढत झाली होती.दरम्यान पराभव झाल्यानंतर देखील सुधीर मुनगंटीवार यांनी विकासच आपले मुख्य व्हिजन असल्याचे स्पष्ट केले. पराभव बाजूला सारून ते पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागले आहेत.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!