
चंद्रपूर
लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागलाय.पण जिंकल तर माजायच नाही अनं हार झाली झाली तर लाजायच नाही.हा नारा देणारे राज्याचे वने,सांस्कृतिककार्य,मत्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज चंद्रपुरात पार पडलेल्या महाअधिवेशनात चौफेर फटकेबाजी केली.काॅग्रेसची वृत्ती ‘‘रावणी’’ आहे असे सांगत त्यांनी प्रहार केलाच.पण लोकसभा निवडणुकीत कुणी गददारी केली.याची यादी आपल्या गुप्तहेराने विरोधी उमेदवाराच्या कार्यालयातून आणली.अशा कार्यकर्त्यांना इंजेक्शन देणार,वेळप्रसंगी त्यांचे अॅापरेशन देखिल करणार असल्याचे सांगत त्यांनी आपला आक्रमक बाणा दाखवून दिला.
विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत.आधीच लोकसभा निवडणुकीत भाजप मित्रपक्षाला मोठा फटका बसला.राज्यातील अनेक भाजप मंत्रीमहोदयांचा या निवडणुकीत पराभव झाला.भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या फळीतील सुधीर मुनगंटीवार यांनादेखिल पराभवाचा सामना करावा लागला.लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती होउ नये.यासाठी भाजपने कंबर कसली आहे.राज्यभरातील प्रमुख नेते यासाठी अलर्ट झोनवर आहेत.अशात आज चंद्रपुरात भाजपने महाअधिवेशन आयोजीत केले होते.या महाअधिवेशनात चंद्रपूर नगरातील व ग्रामीण भागातील अनेक पदाधिकारी,कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या महाअधिवेशनात बोलतांना सुधीर मुनगंटीवार यांनी विविध पैलूवर प्रकाश टाकला.विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत.अशावेळी प्रामाणीकपणे दिवसाचे चार तास तरी पक्षासाठी दया असे आवाहन त्यांनी केले.
भाजपचा गुप्त”हेर”, काॅग्रेसमध्ये चिंता….!
लोकसभा निवडणुकीतील विरोधी उमेदवार प्रतीभा धानोरकर यांच्या कार्यालयातून आपल्या गुप्तहेराने भाजपच्या विरोधात कुणी कुणी काम केले आहे याची संपुर्ण यादीच आणली अनं दाखविली.असे मुनगंटीवार यांनी सांगितले.विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर खासदार प्रतीभा धानोरकर यांनी विजय मिळवून देण्यात भूमीका बजावणा-या भाजप नेते व कार्यकर्त्यांचे जाहीररित्या आभार मानले होते.आता या गुप्तहेराच्या मुदयावरून धानोरकर गोटात चांगलीच चलबिचल सुरू झाली आहे.
तर “आपरेशन”च करणार
कार्यकर्ता हा पक्षाचा पाया असतो.आम्हीदेखिल पक्षाचे कार्यकर्तेच आहोत.लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केले आहे.याची जाणीव आम्हाला आहेच.पण अशांना मी आता समज देणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.त्यांना इंजेक्शनचा डोज देउन बघतो.नाहीतर सरळसरळ “आपरेशन” करावे लागेल असा सज्जड इशारा मुनगंटीवारांनी यावेळी दिला.


