Sunday, October 11, 2026

‘‘बाबां’’शी दोन हात करण्यासाठी “राजे” अम्ब्रीशरावांची जोरदार फिल्डींग

गडचिरोली :-

राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर होताच जे ते नेते कामाला लागले आहेत.विद्यमान आमदारांपूढे आपली खुर्ची टिकविण्याचे आव्हान आहे.तर पराभूत झालेले उमेदवार पुन्हा नव्या उमेदीने मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत.आपल्या पक्षाने उमेदवारी दयावी अशी त्यांची अपेक्षा आहे.पण सध्या राज्यात महायूती,महाविकास आघाडीचे राजकारण आहे.अशा स्थितीत अनेकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.कुणाची तिकीट कधी कापली जाईल.अनं कुणाला अनपेक्षितपणे गूड न्यूज मिळेल.याची शाश्वती उरलेली नाही.मुंबईत 36 जागांवरून वातावरण पेटल असतांना राज्याच्या शेवटच्या टोेकावरील अहेरी विधानसभा मतदारसंघात जोरदार रस्सीखेच,यातून आरोप प्रत्यारोपाच्या फै-या झाडल्या जात आहेत.अहेरीच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असणारे आत्राम कुटुंबातील तिन सदस्यांनी एकमेकांविरोधात निवडणूक लढण्याचा चंग बांधला आहे.गडचिरोलीचे माजी पालकमंत्री,व अहेरी विधानसभा मतदारसंघाचे मागील काळात नेतृत्व करणारे राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी धर्मरावबाबा आत्राम यांना आव्हान देत जोरदार फिल्डींग लावली आहे.

रस्ते,सुरजागड,बेरोजगारी,हेलीकाॅप्टर,कुचकामी ठरणारी आरोग्य यंत्रणा असे अनेक मुददे सध्या अहेरीत चांगलेच गाजत आहेत.याचाच फायदा घेत सत्ताधा-याविरोधात वातावरण निर्माण करण्यासाठी विरोधक आता सरसावले आहेत.
एकीकडे महायुतीने अदयापही आपले उमेदवार जाहीर केले नाहीत.अशावेळी अहेरी विधानसभा मतदारसंघाची जागा हि भाजपच्याच वाटयाला येईल असा विश्वास राजे अम्ब्रीश यांना आहे.दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कोटयातून हि जागा धर्मरावबाबा आत्राम यांना मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.यामुळे अहेरी विधानसभा मतदारसंघाची जागा नेमकी कुणाच्या वाटयाला येते,त्यानंतर येथील राजकीय समीकरण कसे असतील याचीही चर्चा आता सुरू झाली आहे.

अहेरीत विधानसभेची तयारी करण्यासाठी विविध राजकीय पक्षाने जोरदार तयारी चालविली आहे.एकीकडे आत्राम कुटुंबिय आमनेसामने असतांना दुसरीकडे काॅग्रेसनेही या जागेवर दावा केला आहे.अशात राजे अम्ब्रीशराव आत्राम हे गावोगावी भेटी देत आहेत.विविध समाजाच्या कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवित आहेत.विशेषत धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरोधात ते अतिशय स्पोटकरितीने भाष्य करीत आहेत.सध्या हा मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम व राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्यात कमालीचे शाब्दिक व्दंद बघायला मिळत आहे.रस्त्याच्या मुददयावरून तर मंत्रीमहोदयांना विरोधकांनी चांगलेच जेरीस आणल्याची स्थिती आहे.

अहेरी विधानसभा क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूप मोठा आहे.येथील शेकडो गाव अजुनही मुख्य प्रवाहापासून दूर आहेत.या मतदारसंघात मागील काळात आरोग्य यंत्रणेची पुरती पोल खोलणा-या तिन घटनांनी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवरून सोडल होत.अशावेळी येथील सामान्यांना कोण न्याय देईल हा प्रश्न आहे.सध्या निवडणुकीच्या काळात आपणच तुमची समस्या सोडवू शकतो असे आश्वासन नेते देत आहेत.अहेरी विधानसभा मतदारसंघाच्या बदलते राजकीय समीकरण येणा-या दिवसात सर्वांसमोर अशणार आहे.अशा स्थितीत आता विविध नेत्यांचे समर्थक जोरात कामाला लागले आहेत.

 

 

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!