Saturday, October 10, 2026

मुख्याधिकारी चौधरी म्हणाले,जमणार नाही..आल्याआल्या अशी केली कारवाई …..!

चंद्रपूर
गोंडपिपरीत मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर झाला आहे.नुकतेच रूजू झालेले मुख्यधिकारी विवेक चौधरी यांनी आता कारवाईचा बडगा उचलला आहे.त्यांनी केलेल्या एका कारवाईत तब्बल 34 मोकाट जनावरे जप्त करण्यात आली.तर 14 जनांवरांना त्यांच्या मालकांना दंड ठोकून सूपूर्द करण्यात आले.तर उर्वरित जनावराना चंद्रपूरच्या प्यार फाउंडेशन यांना देण्यात आलीत.

गोंडपिपरी नगरात विविध समस्या भेडसावत आहेत.याठिकाणी अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर झाला आहे.अशात मोकाट जनावरांचाही मोठा विषय आहे.या मोकाट जनावरांमुळे अनेकांचे अपघात झाले आहेत.अनेकांना जिव गमवावे लागले.विवेक भाउसाहेब चौधरी हे गोंडपिपरी च्या मुख्याधिकारीपदी रूजू झाले.त्याच्या माध्यमातून गोंडपिपरी पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळाला आहे.अशात आल्याआल्याच चौधरी यांनी मोकाट जनावरांचा प्रश्नाकडे गंभीरतेने घेतले.त्यांनी नगरात करवाई करीत 34 जनावरांना पकडले.त्यांची संपूर्ण व्यवस्था करून प्यार फाउंडेशन कडे सोपविण्यात आले.तर 14 जनावरांच्या मालकांना दंड ठोकविण्यात आला.

मुख्याधिकारी विवेक चौधरी यांनी हि कारवाई केली.यावेळी नगरपंचायतीचे शहर समन्वयक शुभम पाटील,बांधकाम अभियंता आदेश मेश्राम,नगरपंचायत चे कर्मचारी सत्यशिल पूणेकर,वरिष्ठ लिपीक संजय सयाम,अमोल कुळमेथे होते.

 

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!