Sunday, June 28, 2026
spot_img

भोंगळेंना उमेदवारी……! निमकर म्हणाले,जमणार नाही. धोटे,बोंडे पत्रकारपरिषदेतून मांडणार भूमीका

चंद्रपूर:-

राजुरा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी भाजपने देवदार भोंगळे ंयाना जाहीर केली.यानंतर आता भाजपत कधी नव्हे तेे पहिल्यादां मोठा नाराजीचा सूर उमटत आहे.माजी आमदार सुदर्शन निमकर,संजय धोटे,खुशाल बोंडे हे आता एकत्र आले आहेत.त्यांनी भोंगळेच्या उमेदवारीचा तिव्र विरोध केला आहे.आज दुपारी ते सामुहिकरित्या पत्रकारपरिषदेतून आपली भूमीका मांडणार आहेत.

चंद्रपूरातील राजुरा विधानसभा मतदारसंघात अतिशय आणीबाणीच्या स्थितीत भाजपला मोठे मतदान मिळाले होते.यामुळे या मतदारसंघात पुन्हा कमळ फुलू शकते असे भाजपला वाटत आहे.दरम्यान देवराव भोंगळे यांना राजुरा ममतदासंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली.त्यांच्या उमेदवारीला स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे.माजी आमदार सुदर्शन निमकर,माजी आमदार संजय धोटे,भाजपचे जेष्ट नेते खुशााल बोंडे यांच्यासह अनेक नेते एकत्र आले.त्यांनी अतिशय परखडपणे भोंगळेच्या उमेदवारीला कमालीचा विरोध केला.आज हि मंडळी राजुरा येथे पत्रकार परिषद घेउन आपली भूमीका स्पष्ट करणार आहे.

निमकर म्हणाले जमणार नाही……..!

देवराव भोंगळे यंाच्या उमदेवारीला मोठा विरोध होत आहे.भाजपचे शेकडो कायकर्ते हे नाराज आहेत.राजुरा विधानसभा मतदारसंघातून देवराव भोंगळे यांना भाजपने उमेदवारी दिली.मात्र भोंगळे हे बाहेरील असल्याचे निमकरांनी म्हटले आहे.आज दुपारी भाजपने नेते हे राजुरा येथे पत्रकारपरिषदेतून आपली भूमीका स्पष्ट करणार आहेत.दरम्यान ‘‘पार्सल हटाव राजूरा बचाव’’ हा नवा नारा आता राजु-यात सुरू आहे.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!