चंद्रपूर –
राजुरा विधानसभा मतदारसंघात यावेळी चमत्कार घडला.राजु-यातील प्रस्थापित नेत्यांना चित करित जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी बाजी मारली.भोंगळे यांच्या रूपाने राजु-यात नव्या नेतृत्वाचा उदय होत आहे.सुरवातीला तिस-या क्रमांकावर असलेले देवराव भोंगळे दुस-या अनं शेवटी पहिल्या नंबरवर आले.अर्थात त्यांच्या विजयात गोंडपिपरी तालुक्याची अतिशय महत्वाची भूमीका राहिली.गोंडपिपरीच त्यांच्यासाठी गेमचेंजर ठरला.देवराव भोंगळे गेल्या दोन वर्षापासून राजूरा विधानसभा मतदारसंघात सातत्याने काम करित होते.याकाळात त्यांनी गोंडपिपरी तालुक्याच्या नेतृत्वाची धुरा दिपक सातूपते या युवा नेत्याच्या हातात दिली.अनं त्यांच्याच नेतृत्वात तरूणाईंनी जिवाचे रान करित देवराव भोंगळे यांच्या विजयात मोलाची भूमीका बजावली.
राजुरा विधानसभेचा मार्ग हा गोंडपिपरीवरूनच जातो.मागील अनेक निवडणुकांत याचा चांगला अनुभव राजु-यातील नेत्यांना आला.पण प्रस्थापित नेत्यांनी याकडे दुर्लक्ष केले.तर देवराव भोंगळे यांनी याची जाणीव ठेवीत प्रभावी नियोजन केले.दिपक सातपूते यांच्याकडे त्यांनी भाजपच्या तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली.अध्यक्ष झाल्याबरोबर सातपूते यांनी कुठल्याही स्थितीत विजय आपलाच व्हायला हवा यासाठीचे प्रभावी नियोजन केले.राकेश पून,स्वप्नील अनमुलवार,क्षितीज लोणारे,गणेश मेरूगवार,भानेश येग्गेवार यांच्यासारख्या युवा कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले.भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी देवराव भोंगळे यांच्या विजयासाठी प्रचंड मेहनत घेतली.भाजपकडून जेव्हा उमेदवारीसाठी अनेकांची नाव स्पर्धेत होती.त्यावेळी हे युवा कार्यकर्तेे देवराव भोंगळे यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे होते.गोंडपिपरी तालुक्यात गेल्या दोन वर्षापासून देवराव भोंगळे हे सातत्याने काम करित आहेत.अशावेळी गोंडपिपरीत तरूण नेत्यांनी देवराव भोंगळे यांचे विविध सामाजिक उपक्रम यशश्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली.अनेक नाराज नेत्यांना मनवून त्यांना मुख्य प्रवाहात आणले.देवराव भोंगळे यांच्या विजयात गोंडपिपरीचा मोठा वाटा राहिला.पण तालुक्यातील भाजपचे अध्यक्ष दिपक सातपूते यांच्या नेतृत्वात अनेक नेत्यांनी केलेली मेहनत अखेर फळास आली अनं त्याचा सकारात्मक परिणाम भाजपला दिसून आला.
देवरावदादा भोंगळे यांच्या विजयाने गोंडपिपरी तालुक्याच्या विकासाला मोठीच चालना मिळणार आहे.आम्ही केलेल्य सार्वत्रिक प्रयत्नांना यश आले.या विजयाने विकासाचे नवे पर्व आता सुरू होणार आहे.
दिपक सातपूते
तालुकाध्यक्ष भाजप,गोंडपिपरी



