
चंद्रपूर
एकएक दिवस पिकांना पोरासारख जपल.चार महिने कठोर मेहनत घेतली.पैशाची गुंतवणूकही केली.उदयाची आशा,पिक चांगल झाल तर थोडाफार पैसा हातात येईल अनं काही उर्वरित काम पुर्णत्वास येतील एवढीच त्यांची अपेक्षा.यंदा धानपिक चांगल झाल.आपल्या चार एकर शेतात धानाची कापणी केली.बांधणीही झाली.एक दोन दिवसात या पिकाच्या आशेत सुखात झोपणा-या एका बळीराजाला दुसरी सकाळ मात्र रडविणारी ठरली.सकाळी शेतात जाउन बघितल तर काय….संपूर्ण पिक जळलेल्या अवस्थेत होत.एकीकडे संतापाची लाट तर दुसरीकडे कमालीच्या वेदना..!कुणाला सांगून काही होत नाही याची जाणीव असतांना त्यांनी पोलीसात तक्रार दिली.पण त्याने आता काय होणार….!
भावाच पिक जाळल असतांना दोनचार दिवसात बहिणीच संपूर्ण पिकही जाळून टाकल.बहिणभावांच्या या वेदना कुणाला दिसल्या नाहीत.सारे निवडणुकीच्या चर्चा करण्यात व्यस्त असणा-यांना या गरीब शेतक-यांच्या नुकसानीचे काही देणेघेणे आहे कि नाही असा प्रश्न आहे.त्यांच्याकडून कुणाला अपेक्षाही नाहीत.प्रशासन तर निष्ठूरच आहे. गोंडपिपरीच्या तालुका प्रशासनाने या अतिशय गंभीर प्रकाराची तातडीने दखल घ्यायला हवी होती.पण तस काही होतांना दिसल नाही.
चंद्रपूर जिल्हयातील गोंडपिपरी तालुका हा मागास,दुर्गम व आदिवासी भाग.या तालुक्याला ना कधी लोकप्रतिनीधींनी न्याय दिला.ना प्रशासनाने.
शांताराम राउत या गरीब शेतक-यांच्या चार एकर शेतातील धानपिक जाळल जात.अनं याकड गंभीरतेने बघितल जात नाही.हिच खरी व्यथा आहे.गोंडपिपरी तालुकयातील गरीब जनतेला आपल्या तुटपुंज्या शेतीशिवाय जिवन जगण्याचा दुसरा मार्ग नाही.पण इथेही अनेक अडचणी येतात.अगदी हाती आलेल पिक कुणीतरी जाळून टाकतो.हा अतिशय गंभीर प्रकार.पण कुणालाच कुणाशीच काही देणघेण आहे कि नाही अशी परिस्थीती दिसताहे.
एका गरीब शेतक-यांच्या व त्यांच्या बहिणीच्या शेतातील संपूर्ण धानाचे पुंजणे जाळून टाकण्यात आली.अशा वेळी प्रशासनाने त्यांना मदतीचा हात देणे गरजेचेच आहे.अगदी हाती येणार पिक उभ्या डोळयानी जळतांना बघतांना त्यांच्या हृदयाचा किती कळवळा झाला असेल.याची जाणीव आपण सर्वांना होउ शकणारी नाही.आता प्रश्न एकच आहे.त्यांच्या या वेदंनावर कुणी फुंकर घालणार का ………..?



