Sunday, June 28, 2026
spot_img

“अपराजित” देवराव भोंगळे……… !

 

चंद्रपूर

असे म्हटल्या जाते कि,राजकारणात राजयोगाशिवाय कुणीही यशश्वी होऊ शकत नाही.पण यासोबत कठोर परिश्रमाची तयारी,सामान्यांशी जुळवून ठेवलेली नाळ,सातत्यपूर्ण काम करण्याची तयारी हे महत्वाचे गूणही आवश्यक आहेत.आपल्या प्रभावी नियोजनामुळे काही व्यक्तीमत्व हे अपराजित ठरतात.राजुरा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचीत आमदार देवराव भोंगळे हे ख-या अर्थाने अपराजित ठरले आहेत.त्यांनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत एकही निवडणूक हरली नाही.ग्रामपंचायत सदस्य ते आता आमदार हा त्यांचा यशाचा प्रवास थक्क करणारा आहे.

आपल्या महाविद्यालयीन जिवनापासूनच ते भारतीय जनता पक्षासोबत जुळले.राजकारणाला समाजकारणाचा आरसा बघून त्यांनी या क्षेत्रात पुर्णवेळ काम करण्याचे नियोजन केले.वयाच्या अवघ्या 21 सा व्या वर्षी चंद्रपूर जिल्हयातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या घुग्गूसचे ते सरंपच झाले.या पाच वर्षाच्या काळात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला.दुस-यांदा झालेल्या निवडणुकीत ते सदस्य म्हणून निवडून आले.यानंतर एक एक वरची पायरी त्यांनी गाठली.यानंतर त्यांनी चंद्रपूर पंचायत समितीची निवडणूक लढविली.यातही ते विजयी झाले.यांनतर त्यांना पंचायत समितीचे सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

पुढची निवडणूक हि जिल्हा परिषदेची होती.देवराव भोंगळे यांनी घुग्गूस जिल्हा परिषद क्षेत्रातून हि निवडणूक लढविली.अनं इतिहास रचला.त्यांनी तब्बल 2327 मतांनी प्रतिस्पध्र्यावर मात करित विजय मिळविला.दरम्यान जिल्हा परिषदेत एन्ट्री झाल्यानंतर त्यांना शिक्षण व बांधकाम सभापती म्हणून निवडण्यात आले.राज्याचे जेष्ठ नेते तथा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे राजकीय शिष्य म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला.दरम्यानच्या काळात ते मुनगंटीवार यांचे अतिशय निकटचे झाले.त्यांनी आपल्या राजकीय कौशल्याचा अतिशय नियोजनबध्द वाफर केला.अनं 2017 ते 2020 या कालावधीत चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदावर विराजमान झाले.भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून देवराव भोेंगळे यांनी कामकाज पाहिले.

आपल्या राजकीय प्रवासाचा पुढील टप्पा आपण गाठला पाहिजे हे प्रत्येक राजकीयांचे स्वप्न असते.पण भल्याभल्यांना यात यश येत नाही.हल्लीचा काळ तर कमालीचा स्पर्धात्मक आहे.अशा स्थितीत आपले अस्तित्व टिकवून ठेवणे व पूढील टप्पा गाठणे हि आव्हानात्मकच बाब आहे.पण देवराव भोंगळे यात फिट बसले.त्यांनी अतिशय प्रभावीपणे नियोजन केले अनं यशश्वीही झाले.

2024 च्या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक हि ख-या अर्थाने वेगळीच ठरली.जिल्हा परिषदेचे नेतृत्व केल्यानंतर देवराव भोंगळे यांना आमदार व्हायच होत.यासाठी त्यांनी राजुरा विधानसभा मतदारसंघाची निवड केली.दोन वर्षापासूनच त्यांनी आपले काम सुरू केले.राज्याचे वने,सांस्कृतिक,मत्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार या आपल्या राजकीय गुरूंच्या हस्ते व नावे राजु-यात सेवा केंद्र सुुरू केले.अनं या माध्यमातून त्यांनी आपल्या कामांना सुरवात केली.विधानसभेत जुन्या कार्यकर्त्यासोबतच नवीन कार्यकर्त्याना नेतृत्वाची संधी दिली.तरूणांना सोबत घेतले.प्रत्येक तालुक्यातील भाजप कार्यालयाला त्यांनी अलर्ट मोडवर आणले.अनं त्याचा मोठा फायदा विधानसभा निवडणुकीत त्यांना मिळाला.अगदी शेवटच्या वेळी राजुरा मतदासंघात उमेदवारी कुणाला मिळणार हा प्रश्न निर्माण झाला होता.पण यातही देवराव भोंगळे यांनीच बाजी मारली.आमदार सुभाष धोटे,वामनराव चटप यांच्यासारखे मातब्बर नेते असतांनाही त्यांनी केलेल्या प्रभावी नियोजनामुळे त्यांचाच विजय झाला.त्यांच्या रूपाने पहिल्यांदाच राजूरा विधानसभा मतदारसंघाला आता नवा युवा चेहरा मिळाला आहे.त्यांच्याकडून अनेकांच्या अनेक अपेक्षा आहेत.राज्यात महायुतीची सत्ता आहे.सोबत सुधीर मुनगंटीवार यांची साथ आहे.अशा स्थितीत ते आता विकासाचा वेगळा प्रयोग करतील का हे बघणेही औत्स्युक्याचे ठरणार आहे.देवराव भोंगळे हे उच्चशिक्षीत आहेत.त्यांनी राज्यशास्त्र व समाजशास्त्रात पदव्युत्तर चे शिक्षण घेतले आहे.त्यांनी बिएडही केले आहे.सध्या ते पि.एचडी करित आहेत.आपल्या राजकीय कारकिर्दीत देवराव भोंगळे यांनी अजूनपर्यत तरी एकही निवडणूक हरली नाही.राजकारणाच्या विषयात ते ख-या अर्थाने अपराजित ठरले आहेत.

 

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!