Sunday, June 28, 2026
spot_img

चंद्रपूरात काॅग्रेसच अस पाणीपत नेमक का झाल…….!

 

चंद्रपूर

चंद्रपूर जिल्हा तसा काॅग्रेसचा बालेकिल्ला या जिल्हयातील सहापैकी किमान तिनचार जागांवर त्यांचे आमदार असायचे.यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही या जिल्हयाने काॅग्रेसवरच विश्वास दाखविला.मग विधानसभा निवडणुकीत नेमक असं काय झाले कि चंद्रपूर जिल्हयात काॅग्रेसच पाणीपत झालय.नेत्यांचा अतिआत्मविश्वास,पक्षाअतर्गत निर्माण झालेली दुही.अनं खासदार प्रतीभा धानोरकर यांनी वेळोवेळी केलेली वादग्रस्त विधान काॅग्रेसच्या पराभवात वरील कारणही कारणीभूत ठरली आहेत.असे आता जनताच सांगू लागली आहे.संविधान धोक्यात आहे.म्हणून नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत काॅग्रेसला भरभरून मतदान केल.पण विजयानंतर खासदारांनी केलेली विविध विधान चांगलीच चर्चेत आलीत.

विरोधी पक्षनेते विजय वडेटटीवार यांच्या एकमात्र विजयाने काॅग्रेसची थोडीबहूत लाज राखल्या गेली.पण बाकीच्या पाचही विधानसभा मतदारसंघात झालेला पराभव हा लाजीरवाणाच ठरला आहे.पक्षाने दिलेले चुकीचे उमेदवार हा कळीचा मुददा ठरला.भाउहटटापोटी वरोरा भद्रावतीची सिट हातून गेली.तर बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात डाॅ.गावतूरे यांच्यासारख्या समाजमन जाणणा-या महिला नेत्यांचा पक्षाने विचार करावयास हवा होता.पण तसे करण्यात आले नाही.चंद्रपूरात प्रविण पडवेकरांनी यावेळी कडवी झुंज दिली.पण ते विजयापासून खूप लांब राहिले.ब्रम्हपूरीत पहिल्यांदाच अतिशय अटीतटीची निवडणूक झाली.विरोधी पक्षनेत्यांना विजयासाठी पाणी प्यावे लागले.कृष्णा सहारे या भाजपच्या उमेदवारांनी घेतलेली मत तांेडात बोट घालावयास भाग पाडणारी ठरली.

वरो-यात काॅग्रेसचे पूरते पाणीपत झाल.करण देवतळे यांनी विजय मिळविला.तर अपक्ष उमेदवार मुकेश जिवतोडे यांनी त्यांना कडवी टक्कर घेत लक्षणीय मते घेतली.मुलमध्ये संतोष रावत यांना उमेदवारी मिळाली अनं डाॅ.अभिलाषा गावतूरे यांनी उमेदवारी दाखल केली तेव्हाच सुधीर मुनगंटीवार यांचा विजय निश्चीत मानल्या जात होता.मुनगंटीवार यांच्या मतामध्ये यंदा कमालीची वाढ बघायला मिळाली.त्यांनी निवडणुकीपुर्वी दिलेला शब्द आता पाळला आहे.पोंभुर्ण्यात आता 40 हजार कोटी रूपयाची गुंतवणूक असलेला पोलाद कारखाना होण्याच्या प्रक्रियेला सुरवात देखिल झाली आहे.

 

राजुरा-यातही अतिशय अटीतटीची लढत बघायला मिळाली.सुरवातीला वामनराव चटप आघाडीवर होते.यांनतर सुभाष धोटेंनी बाजी मारली.पण शेवटच्या काही फे-यात देवराव भोंगळेच विजयी झाले.राजुरा विधानसभा मतदारसंघातील गोंडपिपरी तालुक्याने त्यांना विजय मिळवून दिला.मागील निवडणुकीत या तालुक्याने सुभाष धोटे यांना आमदार केले होते.पण त्यांनी या तालुक्याकडे पाहिजे तसे लक्ष दिले नाही.प्रभावी नियोजन केले नाही.त्याचा फटका त्यांना यावेळी बसला.

चिमुरमध्ये पुन्हा एकदा किर्तीकुमार भांगडीयाच विनर ठरले.यावेळी वारजुरकरांनी अतिशय प्रभावीपणे निवडणूक लढली.पण विजय मिळविण्यात ते अपयशी ठरले.
ज्या चंद्रपूरातून काॅग्रेसचे किमान तिन आमदार निवडून यायचे आता मात्र परिस्थिती पुरती बदलली आहे.तब्बल पाच आमदार निवडून आणीत भाजपने चंद्रपूर आमचाच आहे हे सिध्द केले आहे.आता काॅग्रेसला चिंतनाची तर गरज आहेच.पण सर्वसमावेशक नेतृत्वही आवश्यक आहे.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!