Sunday, October 11, 2026

अविश्वास रखडला,अनं नगरसेवक भडकले..आता घेतली बहिष्काराची भूमीका “या” नगरपंचायतीत चाललयं तरी काय….. !

 

चंद्रपूर:-

नगराध्यक्षाचा कालावधी संपण्यापूर्वीच शासनाने पुन्हा त्यांनाच संधी देण्याचा निर्णय घेतला.अनं अनेकांचा हिरमोड झाला.नगराध्यक्ष होण्याचे अनेकांचे स्वप्न भंगले,विरोधात असलेल्या राजकीय पक्षालाही काहीच करता आले नाही.मग त्यांनी सुरवातीलाच सादर केलेल्या अविश्वास प्रस्तावाचा दाखला देत प्रकरण लावून धरले.पण “तारीख पे तारीख” वरून तेही कंटाळले.नगराध्यक्षाला कोंडीत पकडण्याचा एकही प्रयत्न विरोधकांनी सोडला नाही.पण त्यांना तिथेही यश आले नाही.आज 25 रोजी नगरपंचायतीच्या विविध सभापतीपदाची निवड करावयाची होती.पण 14 नगरसेवकांनी तहसिलदारांना पत्र देत सभापतीच्या निवडीवर बहिष्कार घातला.यामुळे आज होणा-या निवड प्रक्रियेला ब्रेक लागला.कुणी शिंदे गटात जाताहेत तर कुणी काय काय भूमिका घेताहेत हे कळायला मार्ग नसल्याने चंद्रपूरातील गोंडपिपरी नगरपंचायतीत नेमक चाललयं तरी काय असे आता विचारल्या जात आहे.

गोंडपिपरी नगरपंचायतीवर काॅग्रेसने शिवसेना उबाठा ला सोबत घेत सत्ता बसविली.काॅग्रेसच्या सविता कुळमेथे या नगराध्यक्षा झाल्या.तर शिवसेनेच्या सारिका मडावी यांच्या पदरात उपनगराध्यक्षपद आले. सुरवातीला सारे आलबेल असतांना काही दिवसातच मात्र नगराध्यक्ष व काही नगरसेवकांत खटके उडायला लागले.तत्कालीन काॅग्रेसच्या तालुका कार्याध्यक्षाने तर नगराध्यक्षावर कमीशन मागीत असल्याचा आरोप करीत काॅग्रेस गोटात खळबळ माजविली होती.
अडीच वर्षांनी सत्तापरिवर्तन होईल.अनं मग आपणच नगराध्यक्ष होउ असे स्वप्न अनेकंानी बघितले.आधीपासूनच फिल्डींगही लावली.विरोधात असलेला भाजप तर तयारच होता.पण राज्यात महायुतीच सरकार आलं.अनं त्यांनी नगराध्यक्षांचा कालावधी पाच वर्ष केला.यामुळे जुन्या नगराध्यक्षांना पुन्हा सुवर्णसंधी आली.पण या निर्णयाच्या आधीच विरोधकांनी व सत्ताधारी पक्षातील अनेक नगरसेवकांनी एकत्र येत नगराध्यक्ष सविता कुळमेथे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता.हे प्रकरण सध्या प्रशासनदरबारी आहे.अनेक दिवस लोटूनही प्रशासनाकडून निकाल येत नाही.यामुळे संतापलेल्या विविध पक्षाच्या चौदा नगरसेवकांनी आता चक्क बहिष्काराचीच भूमिका घेतली आहे.आज 25 रोजी गोंडपिपरी नगरपंचायतीच्या सभापतीपदाची निवड करावयाची होती.पण नगरसेवकांनी तहसिलदार शुभम बहाकार यांची भेट घेतली.त्यांना निवेदन दिले.अनं अविश्वास प्रकरणाला विलंब होत असल्याने आपण बहिष्कार टाकत असल्याचे सांगितले.आता याच प्रकाराची चर्चा होत आहे.

कोण कुठे आहे….!
चंद्रपूरात शिवसेना शिंदे गटाची फारशी ताकद नाही.आता शिंदे गटाचे नेते पक्षासोबत अनेकांना जोडत आहेत.गोंडपिपरी नगरंपचायतीतील काही काॅग्रेस व उबाठाच्या नगरसेवकांचा नुकताच पक्षप्रवेश घडविण्यात आला.गोंडपिपरीच्या नगरपंचायतीत पुर्ण चौ चिंधी कारभार सुरू आहे.कोणता नगरसेवक कोणत्या पक्षात आहे.याबाबत आता चर्चा सुरू आहे.

नळाचं पाणी कुठ हाय रं…!
गोंडपिपरीत कोटयावधी रूपये खर्चुन नवीन पाणीपूरवठा योजना सुरू करण्यात आली.काम फायनल झाले असे प्रमाणपत्र देण्याकरिता अनेकांना गिप्टही मिळाले.मात्र गावातील अनेक भागातील नागरिक नळाच्या पाण्यासाठी बोंबाबोंग करीत आहेत.गेल्या आठ महिन्यापासून अनेकांना बोअरवेलचे दुषीत पाणी प्यावे लागत आहे.यामुळे आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.नगराध्यक्ष सविता कुळमेथे या आपली खुर्ची वाचविण्यात व्यस्त आहेत.अनेकदा निवेदन देऊनही त्यांनी या अतिशय महत्वाच्या समस्येकडे पुरते दुर्लक्ष केले आहे. तर इतरांना सत्तेचे स्वप्न पडत आहे.मुख्याधिकारी विवेक चौधरी यांनी या गंभीर समस्यकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.सत्तेच्या या सारीपाटात मात्र गोंडपिपरी नगरवासियांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.पण ना नगरसेवकांना काही देणेघेणे आहे.नाही प्रशासनाला.आता या मुदयावरून संतप्त नागरिकांनी नगरपंचायतीवर हल्लाबोल करण्याचा इशारा देत तिव्र आंदोलनाची तयारी चालविली आहे.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!