
चंद्रपूरः–
राज्याचे कृषीमंत्री माणीकराव कोकाटे यांना न्यायालयाने एका प्रकरणात दोन वर्षाची शिक्षा ठोठावली.सोबतच 50 हजार रूपयाचा दंड सुनावला.नुकत्याच एका वादग्रस्त विधानाने कोकाटे चर्चेत आले होते.शेतकरी बांधवांची भिका-यांसोबतची तुलनाही त्यांना चांगलीच भोवली होती.आता तर न्यायालयाने कागदपत्रांची फेरफार करून आर्थीक फसवणूकीप्रकरणात शिक्षा सुनावल्यानंतर काॅग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी कोकाटेंचे चांगले चिमटे काढले.फेसबूकवर एक पोस्ट करित विजय वडेट्टीवार यांनी सरकारची लाज निघत असतांना आता तरी मुख्यमंत्री कोकाटेंचा राजीनामा घेतील का असा सवाल उपस्थित केला आहे.
शेतकरी बांधवांची भिका-यांसोबत तुलना करणारे कृषीमंत्री कोकाटे आधीच वादग्रस्त ठरले आहेत.अशात न्यायालयाने निकाल देत त्यांना शिक्षा सुनावल्यानंतर आता ते बॅकफुटवर आहेत.आता कोकाटे यांचा हा मुददा घेत विजय वडेट्टीवारयांनी त्यांना चांगलेच फाईलवर घेतले आहे.कोकाटेवरून राज्य सरकारलाही त्यांनी धारेवर धरले आहे.कोर्टाकडून आदेश निघत असतांना मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री आरोपी मंत्रीमहोदयांना स्वतः क्लिनचीट देत त्यांची पाठराखण करित असल्याचा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला आहे.
1995 साली कागदपत्रांची फेरफार आणी फसवणूक केल्याचा आरोप माणीकराव कोकाटेंवर करण्यात आला आहे.याप्रकरणी माणीकराव कोकाटे व त्यांचे बंधू सुनील कोकाटे या दोघांनाही नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा आणी 50 हजार रूपयाचा दंड ठोठावला आहे.
आता कोकाटेंच्या शिक्षेनंतर मुख्यमंत्री कोणती भूमीका घेतात.कोकाटेंचा राजीनामा घेतात कि त्यांना क्लिनचीट देतात.याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



