Sunday, October 11, 2026

शिक्षक काॅपी गोळा करण्यात होते व्यस्त अनं अचानक आएएस डॉ.बसूर पोहचल्या…….मग काय झाले

चंद्रपूर :-

कधी नव्हे ते पहिल्यांदा काॅपीबहाद्दरांवर कार्यवाहीसाठी प्रशासनाने कारवाईचा बडगा उभारला आहे.ज्या परिक्षा केंद्रावर काॅपी होईल त्यांची केंद्र रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.पण असे असतांनाही दहावी व बारावीच्या परिक्षेत काॅपीचा सुळसुळाट आहे.दरम्यान आज इयत्ता दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर होता.बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे येथील गोपाळराव वानखेडे विद्यालयात आयएएस तथा उपविभागीय अधिकारी डाॅ.अपुर्वा बसूर पोहचल्या.अन बघतात तर काय शिक्षकच विध्यार्थ्यांच्या काॅपी गोळा करित होते.चॊकशीअंती काॅपीसंदर्भात शिक्षकाची मुकसंमती असल्याचे स्पष्ट झाले.आता या प्रकरणी प्रशासनाने सदर केद्रावर कडक कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे.चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या निर्देशानुसार डाॅ.अपुर्वा बसूर यांनी केलेल्या पहाणीनंतर आज नांदगाव पोडे येथे हा प्रकार समोर आला.

इयत्ता 10 वीच्या परिक्षेत इंग्रजीच्या पेपरदरम्यान शिक्षकाच्याच मदतीने सर्रासपणे कॉपी सुरू असलेल्या परीक्षा केंद्रावर जिल्हा प्रशासनाने धाड टाकून कारवाई केली. हा प्रकार शनिवार (दि. 1) रोजी बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील गोपाळराव वानखेडे विद्यालयात घडला.

शनिवारी 10 वी चा इंग्रजीचा पेपर सुरू असताना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या निर्देशानुसार गोंडपिपरीच्या उपविभागीय अधिकारी अपुर्वा बासूर यांनी नांदगाव (पोडे) येथील गोपाळराव वानखेडे विद्यालयाला भेट दिली. येथील वर्गखोली क्रमांक 2 मध्ये विद्यार्थ्यांची तपासणी करीत असतांना शिक्षक दीपक मुरलीधर तुराणकर हे विद्यार्थ्यांजवळ असलेल्या कॉपी गोळा करीत होते. तत्पुर्वी तुराणकर यांनी कॉपी बहाद्दरांवर कोणतीही कारवाई न करता विद्यार्थ्यांना कॉपी करण्याची मुकसंमतीच दिल्याचे निदर्शनास आले. तसेच वर्गखाली क्रमांक 7 मध्ये आणि संपूर्ण शाळेत इतर ठिकाणीसुध्दा मोठ्या प्रमाणात कॉपी असल्याचे आढळून आले.

याप्रकरणी संबंधित परीक्षा केंद्रावर कारवाई करण्यात येणार असून पुढील वर्षापासून गोपाळराव वानखेडे विद्यालय हे परिक्षा केंद्र रद्द करण्याचा प्रस्ताव माध्यमिक बोर्डाकडे पाठविण्यात येणार आहे. तसेच कॉपी करतांना आढळून आलेल्या दोन विद्यार्थ्यांची प्रकरणे रजिस्टर करून बोर्डाकडे वेगळी पाठविण्यात आली आहे. तर कॉपी करण्यासाठी मदत करणारे शिक्षक दीपक तुराणकर यांचा अहवाल बोर्डाकडे पाठविला जाईल. बोर्डाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी (माध्य.) राजेश पाताळे यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात कुठेही परीक्षेदरम्यान कॉपी प्रकरणे निदर्शनास आली तर नागरिकांनी परीक्षा परिरक्षक किंवा शिक्षण विभागाला तात्काळ कळवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!