
चंदपूर
सिमेलगत मोठ्या प्रमाणावर काळे कारनामे होतात.अवैध दारू,गांजा,व तस्करी होते.गोंडपिपरीचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे हे आता अलर्ट मोडवर आलेले आहेत.त्यांनी एक मोठी कारवाई करीत दारू तस्करीवाल्याना चांगलाच दणका दिला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात पूर्णतः दारू बंदी असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात देशी, विदेशी दारूची तस्करी केली जात असल्याचे अधून मधून निदर्शनास येत आहे. पोलिस विभाग देखील दारू तस्करांच्या मुसक्या आवळन्यास सज्ज असल्याचे कारवाई अंती दिसून येत आहे. चंद्रपूर – गडचिरोली राज्य मार्गावरील सुरगाव जवळ गोंडपिपरी पोलिसांनी नाकाबंदी केली असता एका पीक अप वाहनांने गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या देशी ,विदेशी दारूचा पुरवठा केला जात असल्याचे निदर्शनास आल्याने गोंडपिपरी पोलिसांनी दारूसाठासह पीक अप वाहन जप्त केले.दरम्यान १३,९६,१०० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत एका आरोपीला ताब्यात घेतले.
चंद्रपूर जिल्ह्याला गडचिरोली जिल्ह्याची सीमा लागून आहे .त्यामुळे बंदी असलेल्या जिल्ह्यात दारूचा पुरवठा केला जातो. अश्यातच एका चारचाकी वाहनांने अवैधरित्या देशी, विदेशी दारूचा पुरवठा केला जात असल्याची विश्वसनीय माहिती गोंडपिंपरी पोलिसांना मिळाली. दि . ३ मार्च रोजी रात्रौ ११:३० च्या सुमारास ठाणेदार रमेश हत्तोगोटे पोलीस कर्मचाऱ्यांना घेवून सुरगाव येथील टोलनाक्याजवळ नाकाबंदी करून वाहनावर पाळत ठेवून होते. दरम्यान ,पिकअप वाहन क्रमांक MH 34 BZ 5458 समोरून येताना दिसताच सदर वाहन थांबवून तपासणी केली असता त्या वाहनात विनापरवाना, अवैधरित्या देशी ,विदेशी व बियर असा एकूण 5,96,100/- रुपयांचा दारू साठा मिळून आला . आरोपी दानिश इलियास शेख , वय 24 वर्ष रा. बालाजी वार्ड ,चंद्रपूर यास ताब्यात घेतले जप्त दारू साठा व पिकअप वाहन असा एकूण 13,96,100/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपी विरुद्ध मदाका अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांचे मार्गदर्शनाखाली गोंडपीपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रमेश हत्ती गोटे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश कराडे, मारोती मारापे, पोलीस अमलदार अतुल तोडासे, प्रशांत नैताम, सचिन झाडे, तिरुपती गोडसेलवर,सचिन मोहरले, सुनिल गव्हरे, रियाज शेख यांनी केली आहे.
ऐन, सणासुदीच्या तोंडावर गोंडपिपरी पोलिसांनी दारू तस्करांवर कारवाई केल्याने तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.


