
चंद्रपूर:–
काॅग्रेसचे खासदार,देशाचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांच्या छातीत गोळ्या घालू.अशी धमकी भाजपच्या नेत्याने दिली.या प्रकारानंतर आता देशभरातील काॅग्रेस कार्यकर्त्यांसह त्यांच्यावर प्रेम करणा-याना लाखो समर्थकांत संतापाची लाट आहे.दरम्यान आता याच मुद्द्याला घेत काॅग्रेसचे विधीमंडळ नेते, आमदार विजय वडेट्टीवार यांनी तिव्र संताप व्यक्त केला आहे.”नथ्थूराम गोडसेच्या औलादांनो खबरदार” असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.समाजमाध्यमातून केलेल्या एका पोस्टवरून त्यांनी आता आपली भुमिका मांडली.
सध्या बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.अशात विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी वोटचोरीचा मुद्दा समोर आणल्यानंतर भाजपा बॅकफुटवर आली आहे.वोट अधिकारी यात्रेनंतर काॅग्रेस व तेजस्वी यादव यांनी जनतेचे प्रचंड समर्थन मिळत आहे.यामुळे घाबरलेल्या भाजपने तब्बल 75 लाख महिलांच्या खात्यावर दहा हजार रूपये रोजगारासाठी देण्याचा निर्णय घेतला.अगदी निवडणुकीच्या तोंडावर घेण्यात आलेला हा निर्णय मतदारांना लाच देण्याचा प्रकार असल्याचे मत अनेक जण मांडू लागले आहेत.
राहूल गांधी देशातील सामान्य नागरिकांशी एकरूप होत आहेत.त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत आहेत.समाजातल्या अतिशय वंचित,दुर्लक्षीत घटकांना भेट घेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याबाबत आश्वस्त करित आहेत.
भाजपच्या पिंटू महादेव या नेत्याने एका वृत्तवाहिनीवर चर्चा करतांना विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांच्या छातीवर गोळ्या झाडू असे वक्तव्य केले होते.आता यानंतर सर्व़त्र संतापाची लाट निर्माण झाली आहेे.
काँग्रेसचे जेष्ठ नेते,विधीमंडळाचे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी हा मुददा घेत भाजपवर निशाना साधला आहे.या देशात नथ्थूराम गोडसे याने महात्मा गांधी यांना गोळया मारून त्यांची हत्या केली होती.अशा नथ्थूरामांच्या औलादांनो खबरदार असा इशारा त्यांनी दिला आहे.हे वक्तव्य नराधमी वृत्ती आहे.हि प्रवृत्ती भाजपची आहे का हे त्यांच्या नेत्यांनी स्पष्ट करावे असे वडेट्टीवार म्हणाले.
“राहुल गांधी हे देशभरातील सामान्य नागरिकांच्या हिताची भाषा करित आहेत.युवकांकरिताचा ते आवाज बुलंद करित आहेत.महिलांना जागृत करित आहेत.दलीत,आदिवासी,ओबीसी च्या न्यायहक्कासाठी लढा देत आहेत.वोटचोरीचा मुददा समोर आणून निवडणूक आयोग भाजपला कसा मदत करित आहे.हे सांगत आहेत.यामुळे भाजपवाल्यांत प्रचंड भितीचे वातावरण आहे.यातूनच ते आता राहूल गांधी यांना बंदुकीने गोळ्या मारण्याची भाषा करू लागले आहेत.नथ्थूरामांच्या औलादांनो खबरदार.राहूल गांधीच्या अंगाला जर हात लावला तर या देशातील समस्त बहूजन जनतेचा आवाज तुम्हाला,तुमच्या राजकारणाला संपविल्याशिवाय राहणार नाहीत.”
विजय वडेट्टीवार,
विधीमंडळ नेते काॅग्रेस.



