
चंद्रपूर:-
गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत नव्हता.न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आता लवकरच निवडणुका होणार आहेत.निवडणुक प्रक्रियेला सुरवात झाली आहे.जिल्हा परिषद अध्यक्षांचे आरक्षण घोषित केल्यानंतर आता सदस्यपदाचे आरक्षण येत्या 13 ऑक्टो. रोजी होणार आहे.याकडे अनेक उत्साही उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 31 जानेवारी पर्यत पूर्ण करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.यामुळे आता निवडणूक आयोग एक्टिव्ह मोडवर आहे.अशात आता तेरा आॅक्टोबर रोजी सदस्यपदाची सोडत होणार आहे.यामुळे कोणत्या गटात कोणते आरक्षण पडते याबाबत उमेदवारात उत्सुकता अनं भितीही आहे.निवडणूक केव्हाही लागू शकते यामुळे गेल्या तिन वर्षापासून उमेदवारांची तयारी सुरू आहे.अनेक जण अनेक ठिकाणचे रहिवाशी देखिल झाले आहेत.पण निवडणूक लांबतच गेल्याने अनेकांचा हिरमोड झाला.संभाव्य उमेदवारांना याचा मोठा आर्थीक फटका देखिल सहन करावा लागला होता.
पण आता न्यायालयाच्या सक्त सुचनेनंतर निवडणुक आयोगाने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.यानुसार 10 तारखेला संबधीत जिल्हाधिकारी आरक्षण सोडतीसंदर्भातील सुचना प्रसिध्द करतील.13 ऑक्टो. ला सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षणाची अधिसुचना 14 ते 17 तारखेपर्यंत हरकती व सुचना दाखल करता येतील.तर 3 नोव्हेंबर रोजी अंतीम आरक्षण प्रसिध्द होईल.



