
चंद्रपूर:-
राज्यात अतिवृष्टीेने बळीराजाच मोठ नुकसान झालं.उभ्या डोळयादेखत उध्वस्त होणार पिक बघता बळीराजा आपले जिवन संपवित आहे.चंद्रपूर जिल्हयातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले असता मात्र सरकारला त्यांच्याशी काही देणेंघेणे नाही.सरकार आले कि,सरसकट कर्जमाफी करू असे आश्वासन महायुतीने दिले होते.पण ते कृतघ्न निघालेत.आता बळीराजाला हे समजून आले आहे.शेतकरी बांधवांसोबत दगाफटका करणा-यांची खैर नाही.जर त्यांना तुम्ही न्याय देउ शकत नसाल तर खुर्ची खाली करा असा घणाघात खासदार प्रतीभा धानोरकर,माजी आमदार सुभाष धोटे यांनी केला.
चंद्रपूर जिल्हयातील गोंडपिपरी येथे आज दि. 11 रोजी शेतकरी बांधवांच्या न्यायमागणीसाठी जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.येथील जुना बसस्थानक परिसरात दोन तास चक्का जाम करून अहेरी चंद्रपूर महामार्ग रोकण्यात आला.यावेळी शेकडो काॅग्रेस कार्यकर्ते,शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.
राज्यातील शेतकरी बांधवांची स्थिती अतिशय बिकट झाली आहे.अतिवृष्टीन पुरतं पिक उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.असे असतांना शासन अदयापही कर्जमाफी करायला तयार नाही.शेतक-यांचा सातबारा कोरा करावा,राजुरा मतदारसंघातील बोगस मतदारनोंदणी करणारा मास्टरमांईंड शोधून त्याच्यावर कारवाई करावी.यासह अन्य मागण्यांना घेत आज चंद्रपूर जिल्हयातील गोंडपिपरी येथील जुना बसस्थानक परिसरात दोन तास चक्का जाम करण्यात आला.यावेळी शेतकरी बांधव व काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारच्या धोरणाविरोधात तिव्र नाराजी व्यक्त करित घोषणाबाजी केली.यावेळी खासदार प्रतीभा धानोरकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून राज्य सरकारवर तोफ डागली.हे सरकार धनदांडग्यांचे आहे.त्यांना शेतकरी बांधवांशी काही देणे घेणे नसल्याचा घणाघात केला.जर सरकारने सरसकट कर्जमाफी केली नाही तर यापेक्षा आक्रमक आंदोलन शेतकरी करतील असा इशारा त्यांनी दिला.माजी आमदार सुभाष धोटे यांनी मदतीपासून चंद्रपूर जिल्हयाला वळगण्यात आल्याने सरकारावर तिव्र संताप व्यक्त केला.शेतीतील पिकाची अवस्था बघून बळीराजा आपले जिवन संपवित आहे.
आता सरकारला जाग केव्हा येणार असे सांगत त्यांनी सरसकट कर्जमाफीची मागणी केली.दोन तास चक्का जाम करण्यात आल्याने चंद्रपूर अहेरी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.दरम्यान तहसिलदार शुभम बाहकर यांच्यामार्फतीने मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले.यावेळी देविदास सातपूते,अशोक रेचनकर,राजू झाडे,अजय माडूरवार,देवेंद्र बट्टे तुकाराम झाडे,श्रिनीवास कंदनुरीवार,सचिन फुलझेले,विपीन पेददूलवार,सोनी दिवसे,प्रा.शंभूजी येलेकर,रफीक शेख,दिपक फलके,साईनाथ कोडापे,नामदेव सांगडे,धिरेंद्र नागापूरे,विनोद नागापूरे,बालाजी चनकापूरे,सारनाथ बक्षी,संतोष बंडावार,यांच्यासह काॅग्रेसचे शेकडो कार्यकर्ते तालुक्यातील शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या उपस्थितीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
गोंडपिपरी तालुक्याला का वगळले@प्रचंड संताप #
१० ऑक्टो.रोजी एक शासन निर्णय काढण्यात आला.यात चंद्रपूर जिल्ह्यातील १४ तालुक्याचा पूर्णतः बाधित असा समावेश करण्यात आला.मात्र गोंडपिपरी तालुक्याला यातून वगळण्यात आले.याची महिती कळताच आता तालुक्यातून याचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. समाजमाध्यमातुन अनेकांनी याबाबत प्रचंड संताप व्यक्त केला आहे. अतिवृष्टीने गोंडपिपरी तालुक्याचे अतोनात नुकसान झाले असतांना यादीतून वगळले जाणे अन्यायकारकच आहे.



