
चंद्रपूर :-
‘‘मायबाप सरकार’’हा शब्दच आता विरळ झालाय.केवळ मतांच राजकारण करायच अनं आपली पोळी कशी शेकून घेता येईल.एवढाच काय तो विषय हल्लीच्या राजकारणात अगदी स्पष्टपणे दिसतोय.खरतर हि अतिशय धोक्याची घंटा.पण समजणारे किती आहेत हा देखिल मोठाच प्रश्न आहे.अगदी कालपरवाचच उदाहरण याची अनुभूती देणारा ठरलाय.काय झालं.प्रश्न होता अतिवृष्टीचा. 9 ऑक्टो. ला शासनाने निर्णय घेतला अनं.दुष्काळग्रस्त तालुक्याची यादीही जाहीर केली.अनेकांना आंनद झाला.पण रातोरात काय झाल,कुणी चक्र फिरविली माहित नाही.त्या यादीत असलेल्या गोंडपिपरी तालुक्याला वगळण्यात आलय अनं त्याठिकाणी मुल या तालुक्याचा समावेश करण्यात आला.मुल मध्ये शेतकरी बांधवच नाहीत.किंवा तिकडे त्यांची नुकसानच झाली नाही असं आमच म्हणणं नाही.पण हे रातोरात कसं बददलं हा प्रश्न आता तेंलगणा सिमेवरील अतिदुर्लक्षीत गोंडपिपरी तालुकावासीय विचारत आहेत.हे नेमक कस झालंय या मुदयाला घेत आता विविध चर्चां केल्या जात आहेत.पण यामागे कोण आहे.हेही काही लोक ठासून सांगू लागलीत.केवळ आपल्या मतदारसंघातील नागरिकांना खुष करण्यासाठीचा,दुस-यांच्या न्यायहक्काला मारणार का असा संतप्त सवाल आता गोंडपिपरीच्या गल्लीबोडीत विचारला जात आहे.
गेल्या काही दिवसात सातत्याने झालेला मुसळधार पाउस कुणीच विसरणार नाही.यात सर्वत्र नुकसानच नुकसान झालं.राज्यातील चंद्रपूरात तर मोठ नुकसान झालं असतांना शासनाने जिल्हयालाच डावलल होत.पण अनेकांनी आंदोलन केलीत,लढे उभारलेत.यानंतर झोपलेल्या सरकारला हा अन्याय दिसला.मग काय.चंद्रूपर जिल्हयाला नुकसानग्रस्तांच्या यादीत समाविष्ट केल्या गेल.9 ऑक्टो. ला शासन निर्णय काढण्यात आला.यात जिल्हयातील 14 तालुक्यांचा समावेश करण्यात आला.यात सिमेवरील गोंडपिपरी तालुक्याचा समावेश देखिल करण्यात आला.अनेकांना आनंद झाला.थोडासा दिलासाही मिळाला.पण दुस-याच दिवशी नवीन शासन निर्णय आला.ंअनं याठिकाणी गोंडपिपरी तालुक्याला बाद करून मुल तालुक्याचा समावेश करण्यात आला.
आता नेमका हाच मुददा चांगलाच पेटला आहे.गोंडपिपरी तालुक्यातून वर्धा,वैनगंगा,अंधारी अशा तिन मोठया बारमाही नदया वाहतात.तालुक्यातील 98 गावांपैकी निम्म्याहून अधिक गावे नदीकाठावर आहेत.अशात यावेळी आलेल्या पावसाने तालुक्यातील नागरिकांचे तिनतेरा वाजले.पुराने सारचं उध्वस्त केलय.पण अशावेळी मदतीचा हात देण्याऐवजी सरकार तालुक्याची कु्रर थटटाच करित आहे.
आज हा मुददा समोर आल्यानंतर आता अनेक संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत.
काय चालविलय:- देवेंद्र बटटे
गांेडपिपरी तालुक्यावर होत असलेला हा मोठा अन्याय आहे.तो आम्ही खपवून घेणार नाही.अतिवृष्टीमुळे गोंडपिपरी तालुक्याचे मोठेे नुकसान झाले आहे.अशावेळी मदतीचा हात देण्याऐवजी राजकीय फायदयासाठी जर कुणी प्रयत्न करित असेल तर हे निंदाजनक आहे.येथील नागरिक समजदार असून ते योग्य वेळेवर त्यांना त्यांची जागा दाखवतील.
हि तर क्रुर थटटाच.:- रामकृष्ण सांगडे
शासन आधी निर्णय घेउन एका तालुक्याचा नुकसानग्रस्तात समावेश करते.अनं दुस-याच दिवशी तो रातोरात बदलविण्यात येते.गोंडपिपरी तालुक्यातील नागरिक,शेतकरी बांधव काही बालक नाहीत.आम्हाला सार कळत हो.तातडीने हा निर्णय मागे घेत गोंडपिपरीचा समावेश केला नाही तर तिव्र आंदोलन करू.
ये जनता है,बस जानती है,- विपीन पेददुलवार
तीन नदयांनी समृध्द असलेला गोंडपिपरी तालुक्याच्या वाटयाला यावेळी आलेल्या महापूराने उध्वस्त करून सोडलयं.शेतकरी बांधंवाचंे मोठे नुकसान झाले असतांना त्यांना मदतीचा हात देण्याची जबाबदारी हि सरकारची होती.पण सरकारच आपली भुमिका सातत्याने बदलवित आहे.शेतकरी बांधवांच्या हितासाठी आता तिव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल का हे सत्ताधा-यांनीच आम्हाला सांगावे.
दोगलेपणा बंद करा:- राजेश कवठे
एकीकडे एक दिवसाआधी घेतलेल्या शासननिर्णयात गोंडपिपरी तालुक्याचा समावेश असतांे.दुस-या दिवशी तो मात्र डावलल्या जातो.हा काय प्रकार चालला आहे.हा दोगलेपणा सरकारने बंद करावा अन्यथा येथील बळीराजा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही.
तातडीने समावेश करा:- गोैतम झाडे
गोंडपिपरी तालुक्याला नुकसानीच्या यादीतून वगळण्याचा निर्णय हा संतापदायक आहे.याची आता चैफेर निंदा होत आहे.हा संपूर्ण प्रकार राजकीय डावपेचातून करण्यात आला आहे.असेच स्पष्ट होत आहे.आता येथील बळीराजा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही.
अन्यायाला जोरदार प्रतीत्तर:- विनोद नागापूरे
गोंडपिपरी तालुक्याला नुकसानग्रस्तांच्या मदतीत आधी समावेश करणे अनं नंतर वगळण्यात येणे हा प्रकार अतिशय संतापदायक आहे.येथील शेतकरी आता या अन्यायाला उत्तर दयायला तयार झाले आहेत.
शेतकरी बांधवाच्या हिताचाच विचार व्हावा:- समीर निमगडे
शेतकरी बांधव हा आमचा पोशिंदा आहे.आम्ही तालुक्यातील शेतक-यांचीच लेकर आहोत.हा संपूर्ण प्रकार संतापदायक आहे.पण यात राजकारण दुर ठेउन तालुक्यातील बळीराजाला कशी मदत करता येईल यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहेत.
दिपक चटपही संतापले
या संपूर्ण मुदयावर शेतकरी संघटनेचे युवा नेते दिपक चटप यांनी समाजमाध्यमात आपली संतापजनक प्रतिक्रीया दिली आहे.ते म्हणाले,हा सरकारच कृतघ्नपणा असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.
दरम्यान याबाबत गोंडपिपरीचे तहसिलदार शुभम बाहकर यांच्याशी संपर्क साधला असता
गोंडपिपरी तालुक्याचा यादीत समावेश नसल्याचे सांगितले आहे.



