
चंद्रपूर:–
आपली बायको,डार्लींग,प्रेयसी अचानक गायब झाली.तिचा कुठलाच संपर्क झाला नाही.तर तो संबधीत प्रियकर,नवरा कसा रिअेक्ट करेल.हे ज्याला त्यालाच माहित.माणूस या प्राण्याबाबत समाजातील हा प्रकार अस्वस्थ करणारा ठरतो.मग आमचे वन्यजीव त्यापासून कसे वंचित राहतील रे भाऊ .!अनं त्यातला त्यात वाघ….! मस्ती करणारी,बैलांना छेडणारी,त्यांना मारणा-या एका वाघिणीने कहरच माजविला.मग काय वनविभाग पुढे आला.त्यांनी त्या
वाघिणीला जेरबंद केले.मोहिम राबविली अनं दुर कुठेतरी नेउन सोडले.अन येथूनच तो वेडा झाला,पिसा अन खपतीही झाला.गल्लोगल्ली भटकू लागला.प्रेयसीच्या विरहानं बेचैन झालेला तो वाघ नदीपार करून तेलंगणात गेला.पण ‘‘ती’’डार्लींग काही भेटली नाही.काही दिवस वाट बघून थकलेला वाघ पुन्हा इकडे परतला.अन मग प्रेयसीच्या सहवासाअभावी व्याकूळ झालेल्या या वाघाने रौद्रारूप धारण केले.
तो कधी विहीरगावच्या जनावरांना मारायचा तर कधी धामणपेठमध्ये जात शिकार करायचा.प्रेमाच्या नशेत आकंत बुडालेल्या या वाघाने परवा अतीच केलं.चेकपिपरी येथील गरीब शेतकरी पाल. हे बिचारे आपल्या शेतात काम करित होते.मग काय या महाशयाने त्यांचा जिवच घेतला.हि वार्ता परिसरात लगेच पसरली.काहींनी एआय चा वाफर करित इथे हा वाघ आला,तिथे आला असे सांगितले.गोंडपिपरी नगरातील नागरिकही धास्तावले.पहाटे फिरणही लोंकांनी बंद केल.पण हा पटटया काही थांबायच नाव घ्यायला तयारच नाही.
सध्या गावांत व परिसरात या वाघांन कमालीची दहशत माजवलीय.वनविभागाच्या यादीत याचे नांव टी -115 असे आहे.घोसरी परिसरातील हा रहिवाशी होता.त्याची माला/मालती नावाची डार्लीग सोबत असायची.मालतीने जास्तच शहाणपणा केला.वाघिणीपणाचा माज आणला.जनावरांना ताव दाखविला.मग काय वनविभागाने तिला जेरबंद केले.अनं घेउन गेले.तेव्हापासून हा लेकाचा टी -115 खपती झाला.पागलासारखा करू लागला.अनं आपली नाराजगी जनांवरासोबत काढू लागला.चेकपिपरीत तर त्याने संतापाची सिमाच ओलांडली.गावातील गरीब शेतकरी भाऊजी पाल यांना मारूनच टाकले.त्यानंतर या टी वाघाची प्रचंड दहशत माजली आहे.डार्लींग गेली म्हणून एवढी टोकाची भुमिका घेते का बे पोंगळया असे आता काही वन्यजीवप्रेमी म्हणत आहेत.प्रेमात अपयश आले कि कोण काय करील याचा नेम नसतो.टी वाघ सध्या याच भुमिकेत आहे.त्याला आवरण्यासाठी आता वनविभागाला काय करता येईल तेही बघणे महत्वाचेच आहे.
भडकावू नका..तर गुन्हे होणार दाखल..!
प्रेमभंग झालेला टि -115 हा गोंडपिपरी परिसरात दाखल झाल्यापासून त्याच्यावर वनविभागाची नजर होती.त्याने एका चुकीच्या ठिकाणी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.पण तिथे आधीच दुसरा वाघिणीचा प्रियकर होता.तो याला तिकडे येउ देत नव्हता.सैरभैर झालेला हा वाघ आता जिकडेतिकडे फिरत आहे.अनेक जण वाघाला घेत विविध अफवा पसरवत आहेत.ए.आय च्या माध्यमातून फोटो काढून व्हायरल करित आहेत.समाजस्वास्थ बिघडविण्याचा हा प्रयत्न आहे.अशांवर आम्ही गुन्हे दाखल करून कार्यवाही करणार आहोत.त्या वाघाला सुरक्षित सोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.शांततेसाठी सार्वजनिक जागृतीची गरज आहे.
किशोर गौरकार,
वनपरिक्षेत्राधिकारी,धाबा



