Sunday, June 28, 2026
spot_img

काँग्रेस म्हणजे ‘‘एक्स्पायरी झालेलं औषध’’……..!

चंद्रपूर:-
लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू झाली आहे.राज्यात पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील पाच जागांवर निवडणूका होऊ घातल्या आहेत.अशात आपलाच विजय कसा होईल यासाठी भाजप,काँग्रेस चे उमेदवार आमनेसामने आहेत.राज्यातील सर्वांचे लक्ष वेधून घेणा-या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात कमालीचे व्दंद बघायला मिळत आहे.एकमेकांवर वाॅर,प्रतिवार केल्या जात आहेत.अशातच आज चंद्रपूर लोकसभा मतदारासंघाचे भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी काॅग्रेसवर जहरी टिका केली आहे.काँग्रेस पक्ष हा फसवा पक्ष आहे.काँग्रेस म्हणजे ‘‘एक्स्पायरी झालेलं औषध’’ असल्याच ते म्हणाले.शिवसेना पदाधिकारी बैठकीला मार्गदर्शन करतांना त्यांनी हे विधान केलय.

मी आमदार झाला,नामदारही झालो.पण मला खासदार व्हायची इच्छा नव्हती.मी पदाकरिता हपापलेला नाही.मला तर लोकसभेची उमेदवारी नको होतीे.पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आग्रह केला.त्यांचे चारशे पार चे स्वप्न साकार करण्यासाठी आता मी पूर्ण ताकदीने हि निवडणूक जिंकणार आहे.यासाठी मी हि संधी स्विकारली आहे.नरेंद्र मोदी यांनी देशातील आयाबहिणींना सुरक्षा देण्याचे काम केल.याच धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजीत पवार यांच्या नेतृत्वात बचतगटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी 932 केाटी रूपयाची योजना सुरू केली.केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या पध्दतीने शेतक-यांच्या हितासाठी त्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जाते.त्याच धर्तीवर आम्ही महिलांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्याची योजना सुरू करणार असल्याचे मुनगंटीवारांनी सांगितले.चंद्रपूरला देशात सर्वात विकसीत मतदारसंघ बनविण्याच माझ स्वप्न आहे.यासाठी आता आपला विजय होणे आवश्यक आहे.अर्थातच हा विजय आपण सर्वांचाच असणार आहे.आपण नेहमी विकासाला प्राधान्य दिले आहे.चंद्रपुरात विकासाची गंगा आणली.आता याच चंद्रपूरला देशात नंबर वन बनविण्याचा आपला संकल्प असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!