Monday, October 12, 2026

विधानसभा निवडणुकांची चाहूल, संजय धोटे एक्टिव मोडवर

चंद्रपूर:-
नुकत्याच लोकसभा निवडणुका संपन्न झाल्यात.राज्यात भाजपला या निवडणुकीत मोठाच फटका बसला.अशा वेळी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून बैलबट्टा करण्यासाठी पक्षाचे नियोजन जोरात सुरू आहे.यावेळी विजय मिळवून देणारे उमेदवार पक्षाला हवे आहेत.अशात चंद्रपूर जिल्हयात राजूरा विधानसभा मतदारसंघात माजी आमदार संजय धोटे आता एक्टिव मोडवर आले आहेत.शेतकरी संवाद यात्रा काढल्यानंतर ते आता पूरग्रस्त भागांची पहाणी करण्यासाठी सरसावले आहेत.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत संजय धोटे यांनी राजूरा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळविला होता.त्यांच्या रूपाने भाजपने पहिल्यांदाच या मतदारसंघात कमळ फुलविला होता.पण 2019 च्या निवडणुकीत संजय धोटेंना पराभव पत्करावा लागला.आता पुन्हा एकदा संजय धोटे राजूरा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी एक्टिव मोडवर आहेत.नुकतीच त्यांनी राजूरा विधानसभा मतदारसंघात शेतकरी संवाद यात्रा काढली.

भाजपाकडून राजूरा विधानसभा मतदारसंघात यावेळी अनेक नावांची चर्चा आहे.काही नवीन उमेदवार या मतदारसंघातून उभे राहण्यास इच्छुक असून गेल्या वर्षभरापासून आपल्या उमेदवारीसाठी त्यांनी जोरदार फिल्डींग लावली आहे.विविध उपक्रम राबवित या मतदारसंघातील मतदारांशी जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे.अशात आता माजी आमदार संजय धोटे फुल्ल एक्टिव मोडवर आले आहेत.राजूरा विधानसभा मतदारसंघात त्यांनी आपल्या कामांना गती दिली आहे.विधानसभेत मोडणा-या चारही तालुक्यात त्यांनी शेतकरी संवाद यात्रा काढीत आपल्या मोहिमेचा शुभारंभ केला.पण या निवडणुकीत उमेदवारी मिळवितांना यावेळी त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत संजय धोटे तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यांना ५१ हजार ५१ एवढी मत मिळाली होती.

चटपांचे ” वन्स अगेन”
राजूरा विधानसभा मतदारसंघात वामनराव चटप पुन्हा एकदा मैदानात उभे राहणार आहेत.चटप यांनी तिनदा या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे.मागील निवडणुकीतही ते विजयाच्या उंबरठयावर होते.पण शेवटच्या फेरीत त्यांचा अवघ्या काही मतांनी पराभव झाला होता.यावेळीही ते शेवटची निवडणूक लढविणार असल्याचे सांगत आहेत.त्यांचे संपूर्ण कार्यकर्ते गेल्या वर्षभरापासून कामाला लागले आहेत.

कोण आहेत घरभेदी…..!
लोकसभा निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार यांचा झालेला पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.अशात पक्षविरोधी काम करणाऱ्यांची यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.यामुळे आता अनेक घरभेदयांची मोठीच कोंडी होणार आहे.यादी प्रसिध्द झाल्यांनतर त्यात कोणाकोणाचे नांव असणार याकडे पक्षातील अनेकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!