Sunday, October 11, 2026

मुनगंटीवारांनी ठणकावल…..!”यांच्या” विरोधात असेल माझा एल्गार

 

चंद्रपूर

काॅग्रेसने महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा नेहमीच अपमान केला.त्यांच्या विरोधात नाॅन मॅट्रीक उमेदवाराला उभे करून निवडणुकीत पराभव केला.बाबासाहेबांचा जगात गावावाजा होत असतांना त्यांना भारतरत्न उपाधी देण्याचे टाळले.यातून काॅग्रेसींनी आपल्या जातीयवादीपणाची अनुभूती दिली.यावर्षी बाबासाहेबांनी देशाला दिलेल्या संविधान समर्पीत करण्याच्या घटनेला पंछात्तर वर्ष पूर्ण होणार आहे.हा मोठाच महोत्सव असणार आहे.यात सर्वांनी सहभागी होत संकल्प करावा.बाबासाहेबांना नाकारण्याचे काम करणा-या काॅग्रेसच्या जनहित विरोधी विचारांच्या विरोधात आपण एल्गार पूकारणार असल्याचे राज्याचे वने,सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ठणकावून सांगितले.बल्लारपूर येथे भाजपच्या अनु.जाती मोर्चा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मुनगंटीवारांनी काॅग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

आपण कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही.हजारो गरीबांची आपरेशन करून दिलीत.पण त्यांची आडनाव बघण्याचे काम मी केले नाही.माझ्या कार्यालयात कधी जातीपातीच्या थारा राहत नाही. मानवतेचा धर्म मोठा आहे. वंचित आणि शोषितांच्या मदतीला धावून जाण्यासारखे मोठे पुण्य नाही, असे महामानव बाबासाहेब सांगतात. म्हणून मी कधीही जात विचारली नाही. भाजपचे धोरण अनु.जाती विरोधात कधीच राहिले नाही.पण काॅग्रेसने आमच्या विरोधात समाजात विष पेरण्याच काम केल.नरेटिव्ह तयार करीत त्यांनी यासाठी मोहिम राबविली.पण आमचे या समाजातील बांधव आता यांच्या कुठल्याही नौटंकीला बळी पळणार नसल्याचे ते म्हणाले.

काॅग्रेसची सरकार महाराष्ट्रात असतांना त्यांनी केवळ 300 रमाई घरकुल मंजूर केलीत आमच्या सरकारने केवळ एकाच वर्षात साडेसात हजार कुटुंबियांना रमाई आवाज योजनेचा लाभ दिला.सामान्य,गरीब,दलीत,आदिवासी यांच्या सर्वांिगण विकासासाठी आपला लढा कायम असेल असे ते म्हणाले.लोकसभा निवडणुकीत काॅग्रेसने देशातील नागरिकांची फसवणूक केली.भाजप पुन्हा सत्तेत आली तर संविधान बदलविणार असा खोटा प्रचार केला.आता संविधान बदलविण्याची भाषा करणारे अमेरीकेत जाउन काय काय बोलत आहेत हे तर सर्वाच्याच लक्षात आल आहे.
बल्लारपूर येथे आज अनु.जाती कार्यकर्ता मेळावा अतिशय उत्साहात पार पडला.यावेळी मोठया प्रमाणावर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

 

 

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!