Sunday, October 11, 2026

अखेर भाग्यश्री आत्रामांनी निर्णय घेतला..! “या” दिवशी हाती घेणार तुतारी राष्ट्रवादी काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

गडचिरोली

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील राजकारणाच रणकंदन पेटल आहे.याचे पळसाद मुंबईनंतर आता गडचिरोलीतही दिसून येत आहेत.राष्ट्रवादीचे नेते,मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या उपस्थितीत केलेल्या एका विधानानंतर राजकीय चर्चांना वेग आला.अशात त्यांच्या जेष्ठ कन्या भाग्यश्री आत्राम हाती तुतारी घेत वडिलांच्याच विरोधात दोन हात करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.येत्या 12 सप्टेंबर गुरुवारला अहेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्या पक्षप्रवेश करणार आहेत.यावेळी जेष्ठ नेेते अनील देशमुख यांचीही उपस्थिती असणार आहे.

नुकताच अजीत पवार यांनी आपला गडचिरोली दौरा केला.मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या सह जनस्वराज्य यात्रा काढून त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला.या कार्यक्रमात धर्मरावबाबा आत्राम यांनी पक्ष फोडणारे आपले घर फोडू बघत असल्याचे म्हणत शरद पवार यांच्यावर निशाना साधला होता.यानंतर संतापून त्यांनी जी मुलगी बापाची होउ शकत नाही.ती तुमच काय भल करणार असे ते म्हणाले.अशांना प्राणहिता नदीत फेकून त्यांना गोदावरी नदीपात्राव्दारे समुद्रात पाठविण्याची भाषा त्यांनी केली होती.त्यांच्या या विधानानंतर विरोधकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले होते.जे आपल्या स्वतच्या मुलीला नदीत फेकण्याची भाषा करतात ते मतदारसंघातील व राज्यातील लाडक्या लेकींचे काय सरंक्षण करणार असा आशय देत अनेकांनी संताप व्यक्त केला.यांनतर आत्राम यांनी अजीत पवार यांचा व्हिडीओ शेअर करित आपली बाजू झाकण्याचा प्रयत्न केला. अहेरी विधानसभेत रोजगार व विकास केवळ धर्मरावबाबा आत्रामच करू शकतात असे अजीत पवार म्हणाले होते.

राष्ट्रवादी काॅग्रेस मध्ये फुट पाडून अजीत पवार गटाने पक्षावर ताबा केला.त्यांच चिन्हही बळकावल.पण लोकसभा निवडणुकीत त्यांना मोठा धक्का सहन करावा लागला.तर शरद पवार गटाने फुटीनंतरही अतिशय चांगली कामगिरी केली.पक्षफुटीनंतर जे जे नेते शरद पवार यांना सोडून गेले.त्यांना विधानसभेत जागा दाखविण्यासाठी पवार गटाकडून राजकीय फिल्डींग लावली गेली.अहेरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेते धर्मराव आत्राम हे अजीत पवार गटासोबत गेले होते.आता त्यांना धडा शिकविण्यासाठी त्यांची जेष्ठ कन्या भाग्यश्री आत्राम यांच्या हाती तुतारी देणार आहेत.येत्या 12 सप्टेंबर रोजी अहेरी विधानसभा मतदारसंघात जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शिवस्वराज्य यात्रा येत आहे.याच दरम्यान भाग्यश्री आत्राम या हाती तुतारी घेणार आहेत.यामुळे येत्या दिवसात अहेरी विधानसभा मतदारसंघात पितापुत्री आमनेसामने दिसणार आहेत.

पंधरा वर्षाचा प्रवास

भाग्यश्री आत्राम या धर्मरावबाबा आत्राम यांच्या जेष्ठ कन्या आहेत.गेल्या पंधरा वर्षापासून त्या सक्रिय राजकारणात आहेत.विवाहानंतरही त्यांनी आपले राजकारण सुरूच ठेवले.गडचिरोली जिल्हा परिषदेच्या त्या अध्यक्षही होत्या.जिल्हा परिषदेच राजकारण केल्यानंतर त्यांना विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती.खासदार सुप्रिया सुळे
यांच्या त्या खास मानल्या जातात.गडचिरोली येथे अंगणवाडी महिलांच्या आंदोलनात सहभागी होत त्यांनी महायुती सरकारच्या कारभारावर तिव्र संताप व्यक्त केला होता.आता त्या हाती तुतारी घेत विधानसभेच रणशिंग फुंकण्यासाठी तयार झाल्या आहेत.येत्या 12 सप्टेंबर रोजी आपण आपली भूमीका जाहीरपणे मांडणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले आहे.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!