Sunday, June 28, 2026
spot_img

खासदार प्रतीभा धानोरकर यांच हे चाललयं काय……!

चंद्रपूर:-

काॅग्रेस नेते राहूल गांधी देशभरात विविध समुदायाच्या लोकांशी भेट घेत आहेत.त्यांच्या व्यथा वेदना जाणून घेत आहेत.समाजातील शेवटच्या घटकांनाही ते मिठी मारीत आहेत.एकंदरित काॅग्रेस हा सर्वजनांचा पक्ष आहे हा संदेश ते देत आहेत.पण चंद्रपूरमध्ये त्यांच्याच पक्षाच्या खासदार प्रतीभा धानोरकर हा वेगळा सूर काढीत आहेत.ब्रम्हपुरीत नुकताच कुणबी समाजाचा मोठा मेळावा संपन्न झाला.यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून पक्ष कोणताही असेल तर चालेल पण आपल्या समाजाच्या नेत्यांना नेतृत्वाची संधी आपण दयायला हवी असे वक्तव्य केले होते.प्रत्येकाला आपल्या समाजाबाबत आपुलकी असणे स्वाभाविक आहे.पण एक लोकप्रतिनीधी म्हणून निवडून आल्यानंतर अनं सोबत काॅग्रेस पक्ष असल्यानंतर त्यांच्या या वक्तव्यानंतर विविध चर्चांना उधान आलं आहे.यामागे स्वपक्षीयातील राजकीय विरोध झळकत असल्याचे स्पष्ट झाले.मुळात ब्रम्हपूरी हा काँग्रेस नेते, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेटटीवार यांचा मतदारसंघ आहे.अशावेळी त्या मतदारसंघात खासदार धानोकरांचे हे भाष्य वडेट्टीवारांना आव्हान असल्याचे बोलल्या जात आहे.खासदार झाल्यापासूनच प्रतीभा धानोरकर या वादग्रस्त विधान करित आहेत.त्यामुळं चंद्रपुरात खासदार प्रतीभा धानोरकरांचय हे चाललय तरी काय हा प्रश्न विचारल्या जात आहे.

बाळू धानोरकर यांनी मागील लोकसभा निवडणुकीपुर्वी काॅग्रेसमध्ये प्रवेश घेतला.लोकसभेची निवडणूक लढविली अनं जिंकलीही.यानंतर त्यांनी विजय वडेटटीवार यांना शह देण्याचा प्रयत्न केला.जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या मुददयावरून दोंघात चांगलेच बिनसले होते.दरम्यानच्या काळात बाळू धानोरकर यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात आमदार असलेल्या प्रतीभा धानोरकरांनी अतिशय ताकदीने परिस्थीती सांभाळली.अन लोकसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज झाल्या.त्यावेळी काॅग्रेस नेते विजय वडेटटीवार यांनी आपल्या मुलीसाठी उमेदवारी मागीतली.या मुददयांची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात झाली.पण शेवटी प्रतीभा धानोरकरांनी काॅग्रेसची उमेदवारी मिळविली.समोर मुनगंटीवारांसारखे मातब्बर नेते असतांना लोकसभा निवडणुकीत त्यांचा दणदणीत पराभव केला होता

लोकसभेचा गड सर केल्यांनतर प्रतीभा धानोरकरांनी अतिशय आक्रमकपणे आपली भूमीका मांडली.चंद्रपूरातील सहाही विधानसभा निवडणुकीत काॅग्रेसचेच उमेदवार निवडून येतील यासाठी तिकीट कुणाला देउ ते आम्ही ठरवू असे त्या म्हणाल्या होत्या.यावेळी गडचिरोलीचा नाही तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील नेत्याला चंद्रपूरचा पालकमंत्री बनवू,आमदार सुभाष धोटे यांना मंत्री करणार असल्याचे जाहिर करीत त्यांनी विजय वडेटटीवार यांना मोठे आव्हान दिले होते.त्यांच्या या वक्तव्यावर पक्षाअंतर्गत बरच वादळ उटल होत.त्यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खासदार प्रतीभा धानोरकर यांना समज दिली होती.

 

नुकतेच त्यांनी जिल्हयाचे पालकमंत्री व निवडणुकीत पराभूत केलेल्या आपल्या प्रतीस्पर्धी सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधातही ओरड ओकली होती.सुधीर मुनगंटीवार यांना सत्तेचा माज आला आहे.असे त्या म्हणाल्या होत्या.यानंतर भाजपच्या काही महिला कार्यकर्त्यांनी या विधानाचा आक्रमकपणे निषेध केला होता.
विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत.लोकसभा निवडणुकीत दशकांनतर मिळालेल्या यशामुळे काॅग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाल आहे.अनेक नेते विधानसभेच्या निवडणुकीसाठी फिल्डींग लावीत आहेत.लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी फुल्ल फार्मात दिसत आहेत.समाजातील सर्व घटकांना सोबत घेत असल्याचे ते सांगत आहेत अनं करूनही दाखवित आहेत.अशा वेळी मात्र त्यांच्याच पक्षाचे खासदार प्रतीभा धानोरकर या पार्टी लाईन सोडून आपल्या समाजाच्या मेळाव्यात कुठल्याही पक्षाचा असूदया पण समाजाचा माणूस निवडून आला पाहिजे म्हणून सांगत आहेत.यामुळ आता केवळ पक्षातील नेत्याचा राजकीय विरोध म्हणून धानोरकर असले राजकारण करित आहेत काय असे विचारल्या जात आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात कुणबी समाज बांधवांची संख्या मोठी आहे.पण समाज विविध पक्षात दुभागला आहे. अशावेळी आपल्या समाजाची मोट बांधण्यासाठी सामाजिक दृष्ट्या त्यांची भूमिका रास्त असल्याच्या प्रतिक्रिया समाज बांधव देत आहेत.त्याचवेळी मात्र अनेकांनी समाजमाध्यमातून त्यांच्या या भूमिकेचा विरोध केला आहे.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!