
चंद्रपूर:-
वाघांचा जिल्हा,जंगलांचा जिल्हा,क्रांतीकारकांचा जिल्हा अनं अशा अनेक विविधांगाने समृध्द असलेल्या चंद्रपूरच्या गौरवात पुन्हा एकदा मानाचा क्षण आलाय.अनं याला कारण ठरलय बल्लारपूर येथील लाकूड. होय,आता येथीलच लाकडापासून तयार करण्यात येणा-या खुर्चीवर आपल्या देशाचे पंतप्रधान बसणार आहेत.राज्याचे वने,सांस्कृतिक अनं मत्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पंतप्रधान कार्यालयात काष्ठाची रवानगी करण्यात आली.यावेळी मुनगंटीवार यांनी हा आपल्या जिल्हासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगीत चंद्रपूरच्या गौरवशाली इतिहासाला उजाळणी दिली.
चंद्रपूर म्हटल कि सर्वात आधी विषय येतो तो वाघांचा.येथील ताडोबा अभयारण्य आज संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतोय.जिल्हयात मोठया प्रमाणावर असलेले जंगल.अन यात अतिउच्च दर्जाचे सागवान लाकूड अनेकांना प्रभावीत करणारे ठरलेय.अयोध्या येथील श्रीरामांच्या मंदीराकरिताही येथीलच लाकडाचा वाफर करण्यात आला.नवीन संसदेच्या इमारतीतही बल्लारपूचे मोठे योगदान राहिले आहे.आता त्यानंतर पुन्हा एकदा येथील लाकडाला मोठीच मागणी आली.अनं ती होती थेट देशाचे पंतप्रधानाच्या खुर्चीची.होय देशाचे पंतप्रधान आता बल्लारपूरच्या लाकडापासून तयार करण्यात आलेल्या खुर्चीवर विराजमान होतील आज अतिशय उत्साही वातावरणात पार पडलेल्या एका कार्यक्रमात राज्याचे वने,सांस्कृतिक अनं मत्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काष्ठाची रवानगी करण्यात आली.
आजचा हा कार्यक्रम अतिशय वैशिष्टपूर्ण आहे, असा उल्लेख करून वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, देशाच्या सर्वोच्च नेत्यासाठी बल्लारपूर येथून काष्ठ पाठवित आहोत, हा चंद्रपूर जिल्हा, बल्लारपूर आणि वनविभागासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे. बल्लारपूरच्या लाकडापासून तयार होणा-या खुर्चीवर बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा गौरव, विकास आणि प्रगतीचे उच्चांक गाठणार आहे, यात माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. यापूर्वी एफडीसीएम ने अयोध्येचे राम मंदीर, लोकशाहीचे मंदीर नवीन संसद भवन, जी-20 शिखर परिषद पार पडलेले ठिकाण भारत मंडपम आदींसाठी काष्ठ पाठविले आहे. या इमारतींचा प्रत्येक दरवाचा आपल्या लाकडापासून तयार करण्यात आला आहे, याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.
शांती, प्रेम, सद्भावना, सहकार्य यासोबतच चिमूर क्रांतीचा आणि वाघांची भुमी असलेला चंद्रपूर जिल्हा आहे. या वाघाच्या भुमीतून पंतप्रधान कार्यालयासाठी 3018 घन फूट लाकूड दिल्लीला जात आहे. यापूर्वीसुध्दा भारत – चीन युध्दात या जिल्ह्याचे सुपूत्र तत्कालीन मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार सह्याद्रीच्या मदतीला धावून गेले. पंडीत नेहरुंच्या आवाहनाला प्रतिसाद देत भारत – चीन युध्दात सर्वाधिक सुवर्णदान चंद्रपूर जिल्ह्यानेच दिले. अशा विरतेचे, शुरतेचे आणि पराक्रमाचे प्रतिक असलेले काष्ठ बल्लारपूर येथून जात आहे
याप्रसंगी प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, जिल्हाधिकारी विनय गौडा, महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव गौड, ,प्रादेशिक व्यवस्थापक सुमित कुमार, वन अकादमीचे संचालक एम.एस. रेड्डी, पियुषा जगताप, बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी किशोर जैन, सहायक व्यवस्थापक गणेश मोटकर आदी उपस्थित होते.



