
नागपूर:-
एक अभुतपूर्व मेळ साधत नागपूरच्या पवित्र दिक्षाभुमीपासून सेवाग्रामपर्यत पाच दिवसाची संविधान सत्याग्रह पदयात्रा काढण्यात आली.हजारो नागरिकांनी या पदयात्रेत सहभाग घेत सामाजिक न्यायाचा संकल्प केला.हि यात्रा या देशात कलुषीत वातावरण निर्माण करू बघणा-या मानसिक विकृतीला शांततेच्या मार्गाने दणदणीत धडा असल्याचे प्रतिपादन यावेळी महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केले.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा गांधी अनं क्रांतीकारी भगतसिंग यांच्यात किती मोठे वितुष्ट होते.असा विरोधाभास या देशातील तथाकथिताने वारंवार निर्माण केला आहे.पण या सा-या महापुरूषांनी या देशात समतावाद रोवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य बहाल केले.या महापुरूषांच्या विचाराचा वारसा घेत नागपूरातील दिक्षाभुमी ते वर्धातील सेवाग्राम येथे पाच दिवस पदयात्रा काढून संविधान सत्याग्रह करण्यात आला.
या सत्याग्रहाच्या निमीत्ताने अनेक ऐतिहासिक घटनांना उजाळा देण्यात आला.महात्मा गांधी यांनी सेवाग्राम येथे अनेक वर्ष वास्तव्य केले होते.देशाच्या स्वातंत्राकरिता हे चळवळीचे मोठे केंद्रस्थान ठरले होते.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांची झालेली भेट ऐतिहासिक ठरली.महात्मा गांधी अनं क्रांतीकारी भगतसिंग यांचा मोठा विरोध होत असे बिंबविल्याही गेले.पण दिक्षाभुमी ते सेवाग्राम या पदयात्रेत म.गांधी यांचे पणतू तुषार गांधी व भगतसिंग यांचे वारसदार जगमोहनसिंग यांनी एकत्रपणे उपस्थिती दर्शविली.या संपूर्ण पदयात्रेत काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवधन सपकाळ यांची भुमिका महत्वाची ठरली.28 सप्टेंबर रोजी नागपूरात मं.गांधी यांच्या पुतळयााला नमन करण्यात आले.क्रांतीकारी भगतसिंग यांच्या जयंतीदिनी नागपूरात भव्य मशाल यात्रा काढण्यात आली.यानंतर पवित्र दिक्षाभुमी ते वर्धा जिल्हयातील सेवाग्राम पर्यत पदयात्रा काढून संविधान सत्याग्रह करण्यात आला.
गांधी,सपकाळांनी केले गडचिरोलीचे कौतूक
पाच दिवसाच्या संविधान सत्याग्रह पदयात्रेत गडचिरोली जिल्हयातील पाचशेहून अधिक पदयात्री सहभागी झाले होते.अतिशय नियोजनबध्दपणे कुठलाही फोटोसेशन न करता त्यांनी तब्बल पाच दिवस पदयात्रा केली.त्यांच्या या नियोजनाने तुषार गांधी,हर्षवर्धन सपकाळ यांनी कौतुक केेले.पदयात्रेक-यासोबत संवाद साधीत त्यांनी या पदयात्रेत तुम्ही दाखविलेला उत्साह आणी प्रामाणिकपणा पुढील लढयाकरिता बळकटी देणारा आहे असे गौरोददार काढले.
“दिक्षाभुमी ते सेवाग्राम हा पाच दिवसाचा संविधान सत्याग्रह आम्हा सर्वांकरिता प्रेरणा देणारा ठरला.मं.गांधी,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,भगतसिंग या महापूरूषांची मेळ बांधणारी हि पदयात्रा आम्हासांठी उर्जा देणारी ठरली.”
महेंद्र ब्राम्हणवाडे,जिल्हाध्यक्ष,काॅग्रेस कमिटी,गडचिरोली.



