Sunday, June 28, 2026
spot_img

चिंता,संताप अनं आक्रोश…….!

बळीराजा अनं “संकट” यांचे अतिशय निराळेच नाते आहे.शेतकरी राजा संकटांपासून जेवळ दुर जाण्याचा प्रयत्न करतो.तेवढयाच ताकदीने “ती” त्यांच्याजवळ येतात,त्यांना रडवूनच सोडतात.निसर्गाची अवकृपा हि नित्याचीच झाली असतांना दुसरीकडे ज्याच्याकडे आशेन बघावे तेही प्रचंड नाराज कडून सोडतात.अगदी हाताजवळ येणारा मदतीचा घास एका रातीतून हिरावला जातो.बिच्चारा शेतकरी आपल्या गावातील चौकात बोलण्यातून संताप व्यक्त करण्यापलीकडे काही एक करू शकत नाही.नेमका याचाच फायदा राजकारणी मंडळी घेतात.

बळीराजाला मदत करण्याच्या नावाखाली सध्या फोटोसेशन च पिक आलय. अनेक जन आंदोलन करण्याचा इशारा देतात.या सगळया बाबी बघून बळीराजा कमालीचा वैतागलाय.अनं संतापलाय.बळीराजाचा किती अंत बघायचा, आदिवासी, मागास, अन उपेक्षित,दुर्लक्षित,वंचित गोंडपिपरी तालुक्यातून समोर आलय. शेतक-यांना मदत करण्यासाठी शासनाकडून पहिल्या दिवशी एक निर्णय घेतला जातो.त्यात चंद्रपूरातील गोंडपिपरी  तालुक्याचा समावेश असतो.अनं एकाच रात्री तो बदलविल्या जातो.एका रात्री नेमकं अस काय झालं.हा प्रश्न आता येथील बळीराजापूढे पडला आहे.

शासनाच्या या एका निर्णयानं हजारो शेतकरी बांधवांत भिती,संताप अनं आक्रोश आहे.मदतीपासून गोंडपिपरी तालुक्याला वगळणे हि प्रशासनाची मोठी चूक आहे.कि कोणत्या राजकीय नेत्याचा गेमप्लन आहे.याचाही शोध येथील शेतकरी नेत्यांना घ्यावा लागणार आहे.बळीराजाची अशी क्रूर थट्टा करणारे हे आहेत तरी कोण, हे येथील शेतकऱ्यानाही आता समजायला हवेय.तिन मोठया नद्या बारमाही वाहतात.या नद्याशेजारीच अख्खा अर्धा तालुका वास्तव्य करतोय.गेल्या काही दिवसात गोंडपिपरी तालुक्याला पावसाने अक्षरश झोडपलय.बळीराजाचे अतोनात नुकसान झाले.पण प्रशासनदरबारी तालुक्यात पाहिजे त्या प्रमाणात पाउस झाला नसल्याची नोंद आहे.आता हि नोंद चुकीची घेण्यात आली का हे ही तपासणे गरजेचे आहे.

नुकसानग्रस्त तालुक्याची नोंद नसल्याने हजारो शेतक-यांना मदतीपासून सरळसरळ वंचितच करणे आहे.गोंडपिपरी तालुक्याला मदतीपासून वगळण्यात येणे,धानउत्पादक शेतक-यांना धानाचा बोनस न देण्याचा बोगस प्रकार करणे.हे चित्र बळीराजाची सत्ताधारी व प्रशासन मिळून कशी पिळवणूक करित आहे.हे स्पष्ट करण्यासाठी पुरेसच आहे.एरव्ही लहानलहान बाबी फुगवून सोशल मिडीयावर मोठमोठया गोष्टी करणारे या गंभीर मुदयावर का चुप्पी साधून आहेत.हाही प्रश्न आहे.

शेतकरी संघटना करणार शासन निर्णयाची होळी

राज्य शासनाने निवडणुकीपूर्वी सरसकट कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते.पण सत्तेत आल्यानंतर सत्ताधा-यांनी पलटी मारली.यामुळे राज्यभरातील बळीराजात संताप आहे.दरम्यान शेतकरी संघटनेनी आता हे मुददे घेत आंदोलनाची तयारी केली आहे.शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष दिपक चटप यांच्या नेतृत्वात उद्या
दिनांक 16 रोजी चंद्रपूरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासन निर्णय होळी आंदोलन करण्यात येणार आहे.शेतक-यांचा सातबारा कोरा करावा,राज्य शासनाने जाहीर केलेल्या 9 अनं 10 आॅक्टो.च्या फसव्या पॅकेजमध्ये तातडीने बदल करावा.गोंडपिपरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त मदत यादीत समावेश करावा.यासह अन्य मागण्यांना घेत हे आंदोलन करण्यात येणार आहे.

आमदार देवराव भोंगळे मुख्यमंत्र्यांना भेटले.
गोंडपिपरी तालुक्याला अतिवृष्टीच्या मदतीपासून वगळल्याने तालुक्यात प्रचंड संतापाचे वातावरण आहे.माध्यमांनी हा विषय रेटून धरल्यानंतर राजुरा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.त्यांना एक निवेदन देत गोंडपिपरी तालुक्याचा समावेश करण्याची मागणी केली.

शरद पवारांची राष्ट्रवादीही आक्रमक
चंद्रपूर जिल्हयातील शेवटच्या टोकावरील गोंडपिपरी तालुक्याला गेमप्लन करून वगळण्यात आल्याचा आरोप करित शरदचंद्र पवार गटाने तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.भाजपच्या एका सत्ताधारी आमदारांना खूष करण्यासाठी त्यांच्या मतदारसंघातील तालुक्याचा ऐनवेळी समावेश करून गोंडपिपरीतील हजारो शेतकरी बांधवंाना बळीचा बकरा बनविण्यात आल्याची टिकापक्षाचे तालुकाध्यक्ष राजेश कवठे यांनी केली आहे.आज पक्षाच्या वतीने तहसिलदार शुभम बाहकर यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री महोदयांकडे निवेदन पाठविण्यात आले.तातडीने जर गेांडपिपरीवरील अन्याय दुर झाला नाही तर राष्ट्रवाद काॅग्रेस च्या माध्यमातून सोमवारपासून आमरण उपोषणाचे हत्यार वाफरून तिव्र आंदोलन छेडल्या जाईल असा इशारा देण्यात आला..यावेळी तालुकाध्यक्ष राजेश कवठे,शेतकरी नेते शंकर पाल,अरूण वासलवार,कुणाल गायकवाड,नितीन सेकृतवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

सातपुतेही संतापले
शेतक-यांच्या विविध मागण्यांना घेत नुकतेच गोंडपिपरीत खासदार प्रतीभा धानोरकर,माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते.याचदरम्यान गोंडपिपरीला मदतीपासून वंचित राहावे लागण्याची माहिती मिळाली.दरम्यान यामुदयाला घेत काँग्रेस आता आक्रमक झाली आहे.ज्या गोंडपिपरी तालुक्याच्या भरवशावर देवराव भोंगळे आमदार झाले.त्याच तालुक्यातील बळीराजावर मोठा अन्याय केला जात आहे.एका रात्रीतून शासन निर्णय बदलविण्यात का आला हा आमचा सवाल आहे.जर आमच्या तालुक्याला न्याय मिळाला नाही तर आम्ही जनआंदोलन उभारू असे काॅग्रेसचे तालुकाध्यक्ष देविदास सातपुते यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!