
चंद्रपूर:-
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या,ग्रामपंचायतीच्या निवडणुका म्हणजे लईच भारी.गावखेडयात याची मोठीच चर्चा होत असते.नुकतेच जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण पडले.महिलाशक्तीचाच दबदबा आरक्षणात दिसल्याने अनेकांचा भ्रमनिरासही झाला.अशात संभाव्य उमेदवार कोण कोण असतील हा विषय प्रकर्षाने गावागांवातील कट्ट्यावर सुरू आहे.अशात काॅग्रेसचे विधीमंडळ नेते,आमदार विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार या गोंडपिपरीत येणार अनं करंजी खराळपेठ या सर्वसाधारण महिला साठी राखीव असलेल्या जि.प.मतदारसंघातून निवडणूक लढणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे.यात किती तथ्य आहे हे तर येणा-या दिवसात समजेल.पण ज्या पध्दतीने चर्चा रंगविल्या जात आहेत.त्यामुळे स्थानिक राजकारणात आतापासूनच रणधुमाळी सुरू असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
सध्या चंद्रपूर जिल्हयातील अनेक सत्ताकेंद्र हे भाजपकडे आहेत.आमदार झाल्यानंतर देवराव भोंगळे यांनी नगरपंचायतीवरही कब्जा मिळविला.अशात जिल्हा परिषद,पंचायत समितीही आपल्या हातात असावीत हा त्यांचा स्वाभाविक मनसुबा आहे.
दरम्यान नुकतेच जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण प्रशासनाने जाहीर केले.यात चंद्रपूर जिल्हयातील करंजी-खराळपेठ या जिल्हा परिषद मतदारसंघाचीच चर्चा होत आहे.उमेदवारी जाहीर करण्यासाठी अजुनही वेळ असला तरी इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच जोरदार फिल्डींग लावली आहे.या मतदारसंघातून माजी जिल्हा परिषद सदस्य वैष्णवी बोडलावार या उमेदवारी मागणार आहेत. अर्थात पक्षाच्या अनेक महिला कार्यकर्ता उमदेवारीचा दावा करू शकतात.
पण जिल्हा परिषदेचे आरक्षण पडल्यानंतर संपूर्ण गोंडपिपरी तालुक्याच्या राजकारणात एकच एक चर्चा होत आहे.अनं ती आहे.शिवानी वडेट्टीवार यांची.शिवानी या काॅग्रेसचे दिग्गज नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या आहेत.वडेट्टीवार यांच मुळ गांव हे करंजी आहे.या गावाशी त्यांच वेगळ नात आहे.नुकतच त्यांच्या मातोश्री कमलाताई वडेट्टीवार यांच निधन झाल.गावातील अनेक जण नागपूरला गेले कि,त्यांचे घर गाठत त्यांची आर्वजून भेट घेउन गावाकडे कस काय चाललय याबाबत चर्चा करायचे.स्वत शिवानी वडेट्टीवार या मागील काळात करंजी येथे येउन गेल्या होत्या.दरम्यान आता निवडणुकीची प्रत्यक्षात रणधुमाळी सुरू झाल्यानंतर शिवानी वडेट्टीवार या आपल्या करंजी या मुळ गावातून निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा आहे.यासंदर्भात आम्ही त्यांच्याशी सपंर्क साधण्याचा प्रयत्न केला.पण संपर्क होऊ शकला नाही.जर असं झाल तर येथील राजकीय समीकरण कसे असेल याचीही इंट्रेस्टींग चर्चा केली जात आहे.



