
चंद्रपूर:-
हातच उभ पिक काळ पडताहे.मजवे धानपिक तर नायनाट होण्याच्या मार्गावर आहेत.कापसाचे बोंड पडायले लागलेत,सातत्याने होणां-या पावसाने बळीराजा पूरता हादरलाय.अशात मायबाप शासन मदत करणार,काहीतरी नुकसानभरपाई देणार अशी येथील गरीब शेतकरी बांधवाची माफक अपेक्षा..पण ज्याच्यांकडे नेतृत्व दिलय ते लेकाचे कृतघ्नच निघालेत.एक गरीब शेतकरी शेतात काम करतो.अनं अचानकपणे त्याठिकाणी येउन वाघ त्याला मारतो.हा अतिसंवेदनशिन विषय.पण येथे कुणालाच काही घेणेदेणे नाहीच.एकीकडे एका गावातील गरीब शेतक-याचे आयुष्य संपले असतांना त्याच वेळी आमदार देवराव भोंगळे जंगी नाच नाचतात,जल्लोष करतात.त्या बळीराजाच्या कुटुबांला साधी भेट देण्याचे सौजन्य दाखवित नाहीत. सत्ताधारी असे कसे एवढे असंवेदनशिल असू शकतात असा सवाल विचारत राजेश कवठे यांनी आमदार देवराव भोंगळे यांना फाईलवर घेतले आहे. आमचे शेतकरी बांधव मरत असतांना त्यांच्या जखमेवर मिठ चोळून आमदार भोंगळे कसे काय हासू हासू नाचू शकतात.असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे.
9 ऑक्टो. च्या शासन निर्णयात अतिवृष्टी मदतीच्या सदंर्भात गोंडपिपरी तालुक्याचा समावेश करण्यात आला.पण दुस-याच दिवशी तो बदलविण्यात आला.सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा मतदारसंघातील मूलचा यादीत समावेश झाला.अंन गोंडपिपरीला “खो” मिळाला.राजुरा मतदारसंघाचे नेतृत्व आमदार देवराव भोंगळे करतात.शेतक-यांच्या मदतीसाठी आम्ही जिवाचे रान करू असे अनेकदा त्यांनी बोलून दाखविले आहे.पण तालुक्यावर एवढा मोठा अन्याय होत असतांना हे भोंगळे गप्प का आहेत,मुनगंटीवारांनी ऐनवेळी फिल्डींग लावली.गोंडपिपरीला गायप केले.अनं मूलचा समावेश केला.मग हे महायश काय करताहेत असा सवाल राजेश कवठे यांनी विचारला आहे.अतिवृष्टीतून गहाळ झालेल्या तालुक्यातील शेतकरी वाघाच्या हल्ल्यात आपले जिव गमावित असतांना आमदार भोंगळे चार किलोमीटर अंतरावर जाऊ शकत नाही.त्यांच्या कुटूंबियांना भेट देत नाही.उलट आपल्या उपक्रमाच्या कार्यक्रमात मस्त नाचतात.याला म्हणायचे तरी काय.आमदार भोगळेंनी असंवेदनशिलता गाठली आहे असा दणदणीत टोला कवठेंनी लगावला आहे.
बोडलावार संतापले म्हणाले, ही तर राजकीय स्टंटबाजी
आमदार देवराव भोंगळे हे अतिशय संवेदनशिल व्यक्तीमत्व आहेत.चेकपिपरी येथील भाउजी पाल यांचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दवी मृत्यू झाला.मी स्वत त्या ठिकाणी पोहचलो.मृतकाच्या कुंटुंबियांचे सांत्वन केले.शासनाच्या निधीसोबत वारसदारांना नोकरी मिळावी यासाठी यशश्वी प्रयत्न केले.वढोली येथील कवठे हे या बाबीला आपल्या फायदयासाठी राजकीय रंग देत आहेत.हा प्रकार बरा नाही.विरोधकांकडे सध्या काम नाही.ते उगीच उठाठेव करीत आहेत.आमदार देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात आम्ही लोकसेवेचे काम सातत्याने करीत राहू.असे भाजपचे जेष्ट नेते,माजी जि.प.सदस्य,व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमर बोडलावार यांनी सांगितले.




