Sunday, June 28, 2026
spot_img

अरे,काय चालविल हे,….आता खनिज विकास निधीतूनही ‘‘खो’’ सुभाष धोटे म्हणाले,आमदार भोंगळे तुम्ही नाचण्यातच व्यस्त रहा

चंद्रपूर:-
चंद्रपूर जिल्हयातील गोंडपिपरी तालुक्याला अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित ठेवण्याचे पाप या सरकारने केले.आता खनिज विकास निधीतूनही तालुक्याला ‘‘खो’ देण्यात आलाय.वाघाच्या शिकारीन बळीराजाचा जिव जातोय,नुकसानीन बळीराजा कमालीचा चिंतीत आहे.मात्र या मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे हे नाचण्यात व्यस्त आहेत.यांच काम केवळ फोटोसेशनपूरतच आहे.राजुरा मतदारसंघात झालेली बोगस मतदारनोंदणी हि व्यथीत करणारी आहे.आमदार भोंगळे यांनी असंवेदनशिलतेचा कळस गाठला आहे.रातोरात गोंडपिपरी तालुक्याला वगळण्याचे महापाप करणा-या भाजपच्या नेत्यांच्या या कारनाम्याचा बदला येथील शेतकरी घेतल्याशिवाय राहणार नाही असा हल्लाबोल राजूरा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष धोटे यांनी केला.

वाघाच्या हल्ल्यात बळी गेलेल्या गरीब शेतकरी भाउजी पाल यांच्या कुटुंबियांची माजी आमदार सुभाष धोटे यांची भेट घेतली.त्यांचे सांत्वन केले.यांनतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले.राजुरा मतदारसंघातील गोंडपिपरी तालुक्यावर सातत्याने अन्याय केला जात आहे.आधी अतिवृष्टीच्या मदतीपासून तालुक्याला वंचित करण्यात आले आता खनिज विकास निधीतून तालुक्याला खो देण्यात आला.गोंडपिपरी तालुक्याच्या शेतक-यांचा अंत बघणारा हा विषय आहे.एकतर सरकार मदत देत नाही.दुसरीकडे गरीब शेतक-याचा वाघाच्या हल्ल्यात बळी जातो.

आमदार देवराव भोेंगळे गोंडपिपरीला येतात.आपल्या उपक्रमात मस्त डान्स करतात.पण चार किलोमीटर अंतरावरील चेकपिपरीतील भाउजी पाल यांच्या कुटुंबीयांना भेट देण्याचे साधे सौजन्य दाखवित नाही.हे सत्ताधा-यांचे पापच आहे.आमदार देवराव भोंगळे हे केवळ फोटोसेशन करणारे आहेत.हे वारंवार सिध्द झाले आहे असा घणाघात माजी आमदार सुभाष धोटे यांनी केला.येथील शेतकरी बांधव यांच्या या नाच्या वृत्तीला दणका देल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले.याप्रसंगी जेेष्ठ नेते अजय माडूरवार,तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक रेचनकर,जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र बटटे,शहराध्यक्ष राजू झाडे,माजी तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे,रफिकभाई शेख,सारनाथ बक्षी,गौतम झाडे,महेंद्र कुनघाटकर,बालाजी चनकापुरे,आशिष निमगडे,माधव लडके,अनील कोरडे,राहुल लडके,युवा नेते प्रशांत कोसनकर यांची उपस्थिती होती.

गोंडपिपरी तालुक्यातील बळीराजाला संताप देण्याचे काम सध्या सत्ताधारी करीत आहेत.एकाच रात्रीतून राजकीय चक्र फिरवून गोंडपिपरी तालुक्याला मदतीपासून वंचित केल्या जात आहे.आता तर खनिज विकास निधी तालुक्याला देण्यास ते “ना” म्हणीत आहेत.एकीकडे गरिब शेतकरी मरत असतांना आमदार देवराव भोंगळे मात्र नाचगायन करीत आहेत. बळीराजाचा असा अंत बघू नका अन्यथा आम्ही तीव्र जनआंदोलन छेडू.
अशोक रेचनकर
तालुकाध्यक्ष,काँग्रेस कमिटी,गोंडपिपरी

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!