
चंद्रपूर:-
राज्यात महायुतीचे बहुमतात सरकार आले.अनं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यां प्रमुख उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे व अजीत पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.त्यांच्यासोबत काही वरिष्ट नेतेही मंत्रीपदाची शपथ घेतील अशी अपेक्षा होती.मात्र काल तिघांचाच शपथविधी झाला.यामुळे आता विविध तर्कवितर्क काढले जात आहेत.अनेक मंत्रीमहोदयांना यावेळी डच्चू मिळण्याची शक्यता आहे.तर युवा नेत्यांना मोठी संधी उपलब्ध होणार असल्याचेही बोलल्या जात आहे.अशा मागील कार्यकाळात राज्याचे वने,सांस्कृतिक मत्स्यव्यवसायमंत्री सुुधीर मुनगंटीवार यांच्याकडे यावेळी कोणत्या विभागाचे मंत्रीपद असेल याबाबत आता चर्चा रंगू लागल्या आहेत.
सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे जेष्ट नेते आहेत.भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी यशश्वीपणे पार पाडली आहे.सोबत अनेक विभागाचे मंत्री म्हणून काम करतांना त्यांनी आपला वेगळेपणा सिध्द केला आहे.अर्थमंत्री म्हणून काम करतांना त्यांनी केलेली कामगिरी अनेकांना भावली.वनमंत्री म्हणून वाघाच्या जिल्हयातील राजकारणातील या वाघमाणसाने जागतिक स्तरावर चंद्रपूरची ओळख निर्माण केली.अनेक अभिनव प्रयोग राबविले.विकासाबाबत त्यांचा अनोखा दृष्टीकोन राहिला आहे.सांस्कृतिक मंत्री म्हणून त्यांनी अनेक उपेक्षित कलावंतांना मोठा आधार दिला आहे.
मंत्री म्हणून काम करतांना त्यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघाचा कायापालट केला.उपेक्षित व दुर्लक्षीत पोंभुर्ण्यात आता 40 हजार कोटी रूपयाचा पोलाद प्रकल्प होणार आहे.यामाध्यमातून किमान 60 हजार तरूणांच्या हाताला काम मिळणार आहे.विजयी झाल्याबरोबर त्यांनी दिलेला शब्द पाळला.आता यासंदर्भात प्रक्रियेला सुरवात झाली आहे.
आता राज्यात महायुतीचे सरकार आले आहे.भाजपचे पहिल्यांदाच रेकार्डब्रेक विजय झाला आहे.देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत.काल मोठया दिमाखदार कार्यक्रमात त्यांचा शपथविधी पार पडला.फडणवीस,शिंदे व पवार यांच्यासोबत काही जेष्ठ नेते मंत्रीपदाची शपथ घेतील अशी अपेक्षा होती.मात्र तसे झाले नाही.आता कोणकोणाला मंत्रीपद मिळणार व कुणाला डच्चू मिळणार याचीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे.भाजपचे जेष्ट नेते सुधीर मुनगंटीवार यांना कोणते मंत्रीपद मिळेल याबाबत आता उत्सुकता व्यक्त करण्यात येत आहे.



