Sunday, June 28, 2026
spot_img

गडचिरोलीत “बॅनर” लावण्यास मनाई करीत भाजपच्या नेत्यांना हाकलले……!

गडचिरोली

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात येऊ लागली आहे. गडचिरोली मतदारसंघात काँग्रेस व भाजपात थेट लढाई होण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून डॉ. नामदेव किरसान यांना संधी मिळाली. तर शेवटच्या क्षणी अशोक नेते यांना भाजपच तिकीट देण्यात आलं. पण आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावात भूसंपादनाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. गावाकऱ्यात या मुद्द्याला घेत रोष पसरला आहे.अशातच चामोर्शी तालुक्यातील काही गावात “बॅनर” लावण्यासाठी गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.त्यांनी भाजपचे बॅनर तर लाऊ दिले नाही. उलट भाजपच्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना परत पाठविले. गावागावात विरोध वाढत असल्याने भाजपचे उमेदवार अशोक नेते यांचे टेन्शन चांगलेच वाढले आहे.

गडचिरोली मतदारसंघात मित्रपक्षाची भाजपला पाहिजे तशी साथ मिळत नसल्याची चर्चा आहे.तब्बल दोनदा लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळुनही अशोक नेते यांना लोकांची मन जिंकता आली नाही.अशात आता चामोर्शी तालुक्यात भूसंपादनाचा मुद्दा ऐरनीवर आला आहे.जवळपास 25 गावातील जमीन शासनाने संपादित करण्याचे नियोजन केले आहे. परंतु गावकरी याला विरोध करीत आहेत. या मुद्द्याला घेत दोनदा मोर्चा देखील काढण्यात आला.यामुळं सत्ताधाऱ्यांसह अशोक नेते यांच्यावरही गावकर्यांचा संताप आहे.

आता लोकसभा निवडूकीचा प्रचार ऐन रंगात आला आहे. काँग्रेस, भाजप व इतर पक्षांचे उमेदवार प्रचाराला लागले आहेत. अशातच भाजपचे काही नेते आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेत मुधोलीचक व जयरामपूर या गावात प्रचाराला गेले होते.यावेळी संतप्त गावकर्यांनी त्यांना अक्षरशः हाकलून लावले. एवढेच नव्हे तर त्यांना बॅनर बांधण्यास मनाई करण्यात आली. तुमचे खासदार कुठे आहेत. असे खडे बोल गावकऱ्यांनी सुनावले. हा प्रकार समोर येताच आता भाजप गटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. आधीच मित्रपक्षांची साथ मिळेनाशी झालीय, दुसरीकडे स्वपक्षियातील नेत्यांची सक्रिय भूमिका नसल्याने अशोक नेते यांचं टेंशन वाढलं आहे. अशातच आता गावकरी आपला जाहिररित्या रोष व्यक्त करू लागले आहेत.चामोर्शी तालुक्यातील २५ गावातील गावकरी आता एक बैठक घेऊन आपली पुढील भूमिका घेणार आहेत.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!