चंद्रपूर :-
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आता “इस्ट्रेस्टिंग” झोनवर येउन ठेपलीय.जातीच्या राजकारणाला विकासाने उत्तर देणा-या भाजपने आता दारूचा ”मुद्दा’ समोर आणला आहे.भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिभा धानोरकर यांच्यावर प्रहार करतांना त्यांच्या दुकानामूळे हजारो महिलांचे सौभाग्य उजाळल्याचा आरोप केला होता.याला उत्तर देत धानोरकरांनी वाघांची हवाच काढून टाकली.राज्यातील प्रमुख भाजप नेत्यांचे दारूंचे कारखाने आहेत.मग ते तर महाराष्ट्रच उध्वस्त करायला निघाले का ? असे सांगत प्रतिभा धानोरकर यांनी जोरदार प्रहार केला आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आता अंतीम टप्प्यात पोहचली आहे.भाजपाचे जेष्ट नेते.वनमंत्री सुधीर मुनगंटीवार,आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात ‘‘टफ’’ टू ‘‘टफ’’ लढत होत आहे.गावागावात सध्या याच चर्चा रंगल्या आहेत.मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी दस्तूरखूद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली.भाजपचे अनेक स्टार चंद्रपुरात प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.राजकीय नेत्यांसोबत अनेक कलावंत रोड शो करून सुधीर मुनगंटीवारांसाठी मत मागत आहेत.दुसरीकडे काॅग्रेसचे कार्यकर्ते गावागावात प्रचार करित आहेत.प्रतिभा धानोकरांना विजयी करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.निवडणुकीला काही तास उरले आहेत.अशात हि रणधुमाळी अधिक वेगवान झाली आहे.चंद्रपुरातील या हेविवेट लढाईकडे सा-यांचेच लक्ष आहे.राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी हि लढत प्रतिष्ठेची झाली आहे.



