Sunday, October 11, 2026

कंकडालवारांच्या कामाने विरोधक दणकले, धर्मरावबाबा म्हणाले,हे तर “सिझनेबल” नेते ……!

गडचिरोली
विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत.अशात आपले अस्तित्व टिकविण्यासाठी,परिवर्तनाची नवी उमेद घेत नेते कामाला लागले आहेत.गडचिरोली जिल्हयातील अहेरी विधानसभा मतदारसंघ हा राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा बालेकिल्ला आहे.पण लोकसभा निवडणुकीत त्यांच्या बालेकिल्याला मोठा सुरूंग लागला.अशात आता आत्राम पून्हा एकदा मैदान जिकंण्यासाठी सज्ज आहेत.पण काॅग्रेस नेते अजय कंकडालवार यांनी आपल्या कामाला वाढविलेला झपाटा मतदारसंघात विरोधकांना चांगलीच टेंशन देणारा ठरला आला.अशातच कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या उलटफेराला घेत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.यामुळे अहेरी विधानसभा मतदारसंघात आता आरोपांच्या फे-या झाडल्या जात आहेत.

लोकसभा निवडणुकीत काॅग्रेसने गडचिरोलीत दमदार कामगिरी केली.महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांचा दणदणीत पराभव करित काॅग्रेसचे डाॅ.नामदेव किरसान हे विजयी झाले.लोकसभेच्या निवडणुकीआधी आविस नेते अजय कंकडालवार यांनी काॅग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता.यानंतर त्यांनी दमदार कामगिरी करित अहेरी विधानसभा मतदारासंघात काॅग्रेसला मोठी आघाडी मिळवून दिली होती.लोकसभेचा निकाल बघता मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे चांगलेच टेंशन वाढले.यानंतरच्या काळात आत्राम हे विधानसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत.विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून ते गावागावात दोैरे करित आहेत.इस्पात कंपनीच्या माध्यमातून हजारो तरूणांना रोजगाराचे स्वप्न दाखवित आहेत.अहेरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर अजय कंकडालवार यांची एकहाती सत्ता होती.पण आत्राम यांनी अनेक संचालकांना आपल्या खेम्यात आणले.व सभापतीवर अविश्वास ठराव आणला.यानंतर हा वाद चांगलाच पेटला.रविंद्र आत्राम यांना आपण आपल्या गटाकडून निवडून आणले.धर्मरावबाबा आत्राम यांनी तर रविंद्र आत्राम यांना आपल्या गटाकडून संधी दिली नाही.आता मात्र केवळ राजकीय स्वार्थापोटी ते हा सारा कारभार करित असल्याची टिका अजय कंकडालवार यांनी केली.

विरोधक दणकले…..!
लोकसभा निवडणुकीत अहेरी विधानसभा मतदारसंघात काॅग्रेसला मतांची मोठी आघाडी मिळाली.काॅग्रेस नेते अजय कंकडालवार यांचे यात मोठे योगदान राहिले.आता विधानसभा निवडणुक आपल्या नेतृत्वात जिंकण्यासाठी त्यांनी जोरदार फिल्डींग लावली आहे.संपूर्ण विधानसभा क्षे़त्रात गरीब आदिवासी बांधवाच्या मदतीसाठी ते सरसावले आहेत.यामुळे धर्मरावबाबा आत्राम गटाचे टेंशन वाढले आहे.

हे तर निवडणुका बघून बाहेर पडणारे…….!
जनतेचे खरे सेवक हे नेहमीच मैदानात असतात.पण अहेरी विधानसभा मतदारसंघात नेते निवडणुका तोंडावर बघून आता कुठे घराबाहेर पडू लागले आजपर्यत लपून बसलेल्या नेत्यांना आता कुठे जाग आली आहे.अशी टिका ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी नाव न घेता अजय कंकडालवार यांच्यावर केली.काल एटापल्लीतील जारावंडी येथे राष्ट्रवादी काॅग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडला यावेळी ते बोलत होते.अहेरी विधानसभा मतदारसंघात विकाससाठी मोठया प्रमाणावर विकासनिधी दिल्याचे सांगत येथील हजारो तरूणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करू असेही ते म्हणाले.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!