Sunday, June 28, 2026
spot_img

वडेटटीवार गरजले,ब्रिटीशांचे पाय चाटणारे आता देशभक्तीचे सोंग करताहेत……..!

चंद्रपूर:-
ब्रिटीशांचे पाय चाटणारे आता देशभक्तीचे सोंग करीत आहेत.त्यांनी देशाची अवस्था बिकट करून सोडली आहे.हुकुमशाही व तानाशाही आणण्याचे त्यांचे स्वप्न आहे.याकरिता देशातील नागरिकांना मुर्ख बनविण्याचे काम करीत आहेत.भाजप भारताचे संविधान बदलणार आहे.त्यांचे अनेक लोक आतापासूनच हे खुलेआम सांगत आहेत.देशात आता यापुढे निवडणुका होणार असे वाटत नाही.याकरिता आता आपणास दुस-या स्वांतत्राची लढणे आवश्यक आहे.ब्रिटीशांचे पाय चाटणा-यांना आता हददपार करावेच लागेल असा घणाघात काॅग्रेसचे विरोध पक्षनेेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
चिमूर या क्रांतीभूमी गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार डाॅ.नामदेव किरसान यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेला मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी पुढें बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, विकासाच्या नावावर जनतेचे दिशाभूल करून सत्ता काबीज करणाऱ्या भाजपने देशांत सर्वत्र लूट चालविली आहे. स्वातंत्र्य चळवळीत सहभागी न होता उलट इंग्रजांचे पाय चाटनारे आज देशभक्त म्हणुन मिरवत असून देशासाठी बलिदान देणाऱ्या गांधी घराण्याची नाहक बदनामी करीत आहे. देशांतील महागाई, बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली असताना आपले अपयश लपविण्यासाठी धर्मांधातेचे विष पेरून देशांत अराजकता माजविण्याचे कुटील कारस्थान विरोधकांकडून रचले जात आहे. अशी टीका करत वडेट्टीवारांनी भाजपावर थेट तोफ डागली. तर अश्या देश विघातक सरकारला सत्तेतून हद्दपार करून देशातील संविधान व लोकशाही टिकविण्यासाठी सर्वांनी इंडिया आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे काळाची गरज ठरली आहे. असेही यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
तत्पूर्वी इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ नामदेव किरसान, माजी आमदार डॉ. अविनाश वारजुरकर, काँग्रेसचे चिमुर विधानसभा समन्वयक डॉ. सतिश वारजुरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके यांनी भाजपने गेल्या 10 वर्षाच्या सत्ता काळात जनतेशी केलेला विश्वासघात, देशाची अर्थव्यवस्थेचे झालेले वाटोळे अणि नागरीकांना बसलेली झळ यावर प्रकाश टाकत उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी चिमूर तालुका व परिसरातील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख व हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!